शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
3
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
4
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
5
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
6
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
7
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
8
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
9
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
10
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
11
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
12
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
13
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
14
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
15
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
16
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
17
IND vs BAN : पहिल्या सामन्यात अश्विन-जड्डूची 'दादा'गिरी; गांगुली म्हणाला, "बांगलादेशने पाकिस्तानला..."
18
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
19
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
20
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा

लडाखला बाईकवर गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; वडिलांना शेवटचा फोन करुन सांगितली होती व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 8:53 PM

नोएडातल्या तरुणाचा लडाखमध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्यीच धक्कादायक घटना समोर आली आहे.

Death in Ladakh Bike Trip: प्रवासाची आवड असलेल्या लोकांना आयुष्यात एकदा तरी लेह-लडाखला भेट बाईकवरुन द्यायची असते. त्यामुळे अनेक तरुण  तरुणी हे बाईकवरुनच लडाखला निघतात. मात्र असे करणे एका तरुणाला महागात पडले आणि त्याची किंमत त्याला जीव देऊन चुकवावी लागली. ऑक्सिजनअभावी या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नोएडा येथील २७ वर्षीय तरुण लडाखमधील लेहला जाण्यासाठी बाईकवरुन एकटाच निघाला होता. परंतु लडाखमधील उंच भागात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याची प्रकृती खालावली आणि मृत्यू झाला. चिन्मय शर्मा असे मृत तरुणाचे नाव असून तो नोएडा येथील एका डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये काम करत होता. त्याचे आई वडील मुझफ्फरनगरमध्ये राहत होते. चिन्मय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चिन्मय शर्माने २२ ऑगस्टला लडाखसाठी प्रवास सुरू केला. सुमारे ३५०० मीटर उंचीवर असलेल्या लेहला पोहोचल्यावर त्याने वडिलांना डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे फोनवर सांगितले होते. थोड्यावेळाने पुन्हा चिन्मयने वडिलांना फोन करुन श्वास घेण्यास त्रास होतोय असं सांगितले. मुलाची प्रकृती ठीक नसल्याचे कळल्यानंतर चिन्मयचे वडील पराग शर्मा यांनी लेहमधील हॉटेल कर्मचाऱ्यांना फोन करून मुलाला रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर चिन्मयचे आई-वडीलही लेहला निघाले. 

मात्र त्याआधीच २७ वर्षीय चिन्मय शर्माची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चिन्मयचे पार्थिव मुझफ्फरनगर येथे आणण्यात आले.  शुक्रवारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, लडाखला येणाऱ्या बाहेरील लोकांना उंचावरील भागात ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल किंवा निवासस्थानी दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्यांचे शरीर कमी ऑक्सिजन पातळीशी जुळवून घेऊ शकेल. अल्टिट्यूड सिकनेसला अॅक्युट माउंटन सिकनेस असेही म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला उंचांवर श्वास घेण्यास सामना करावा लागतो तेव्हा असं घडते. यावेळी डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे, थकवा आणि निद्रानाश या गोष्टींचा त्रास सुरु होतो. 

टॅग्स :ladakhलडाखAccidentअपघात