नवी दिल्ली : मूळची दिल्लीच्या मंगोलपूर येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणीवर २७ नराधमांनी जयपूरच्या एका हॉटेलात बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून रॉकी व त्याच्या पत्नीने जयपूरला आणले होते. या दोघांना अटक केली.गत ३० आॅगस्टला रॉकी व त्याच्या पत्नीने पीडितेला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जयपूरला नेले व तेथील इंद्रप्रस्थ हॉटेलात तिला सोडून निघून गेले. यानंतर पुढील २४ तास हॉटेलच्या काही कर्मचाऱ्यांसह एकूण २७ जणांनी पीडितेवर अमानुष बलात्कार केला. यादरम्यान तिला खायलाही दिले गेले नाही. भूक आणि वेदनेने तडफडत असलेली तरुणी कशीबशी हॉटेलमधून निसटली व दिल्लीला पोहोचली. दिल्लीला पोहोचल्यावर तिने तक्रार नोंदवली. ३० आॅगस्टला हॉटेलची खोली बुक करण्यात आली होती. ३० ते ३१ आॅगस्टदरम्यान २४ तास माझ्यावर बलात्कार करण्यात आला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेलच्या मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली.
अल्पवयीन मुलीवर २७ जणांचा बलात्कार
By admin | Published: September 08, 2015 3:07 AM