फेब्रुवारीमध्ये बँकेत जाण्याआधी बँक बंद तर असणार नाही ना हे एकदा चेक करावे लागणार आहे. कारण यंदाचा फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा आहे. तर त्यापैकी 7-8 दिवस बँका बंद असणार आहेत. यामुळे बँकेची कामे तुमच्या वेळेनुसार नाही तर बँकांच्या कामकाजाच्या दिवसांनुसार उरकावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया बँका कधी कधी बंद असणार आहेत.
फेब्रुवारीमध्ये ज्या बँकांना सुट्ट्यामिळणार आहेत त्या राज्यांनुसार वेगवेगळ्य़ा असणार आहेत. 12 फेब्रुवारीला सिक्किमच्या बँकांना सुट्ट्या असणार आहेत. या दिवशी तिथे सोनम लोसार आहे. तर 13 फेब्रुवारीला महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सर्वच ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. 15 फेब्रुवारीला मणिपूरमध्ये बँका बंद असणार आहेत. स्थानिक सण असल्याने तेथील बँका बंद असतील.
16 फेब्रुवारीला वसंत पंचमी असल्याने पंजाब, हरियाणा, उड़ीसा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील बँका बंद राहणार आहेत. 19 फेब्रुवारीला छत्रपति शिवाजी महाराज जयंती असल्याने महाराष्ट्रातील बँका बंद राहणार आहेत. 20 फेब्रुवारीला मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशच्या बँका बंद राहणार आहेत. 26 फेब्रुवारीला हजरत अली जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशच्या बँकांना सुट्टी असणार आहे. 27 फेब्रुवारीला चंदीगढ, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाबच्या बँका बंद राहणार आहेत.
यंदा दीड महिना बँका बंद राहणार....यंदाचे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्यांची पर्वणीच घेऊन आले आहे. 1 फेब्रुवारीला बजेट सादर होईल. मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपेल. भारतीय रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या वर्षभराच्या सुट्ट्यांमध्ये जवळपास 40 दिवस बँका बंद राहणार आहेत.