- त्रियुग नारायण तिवारीअयाेध्या : श्री रामलल्लाच्या अयाेध्येत बुधवारी आठवा दीपाेत्सव साजरा हाेत आहे. हा दीपाेत्सव यंदा अगदी खास असेल; कारण, येथील भव्य मंदिरात यंदा प्रत्यक्ष रामलल्ला विराजमान आहेत. यंदा ५५ घटांवर तब्बल २८ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार असून, हा एक जागतिक विक्रम ठरेल. या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त असून, १० हजार पोलिस तैनात केले आहेत. दीपोत्सवात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती असेल.
हेलिपॅडजवळ उभ्या व्यासपीठावर श्री राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, श्री हनुमान व वशिष्ठ मुनींच्या वेशभूषेतील कलाकारांवर पुष्पवृष्टी केली जाईल. यानंतर रामकथा पार्कमधील व्यासपीठावर ते आसनस्थ होतील. श्री राम-सीता पूजन झाल्यानंतर तेथे प्रतीकात्मक राज्याभिषेक होईल. सायंकाळी शरयू तीरावर आरती होणार असून ‘राम की पैडी’वर शुभमुहूर्तावर दीप प्रज्ज्वलित केले जातील.
लेझर शो अन् आतषबाजीया दीपोत्सवानिमित्त लेझर शोचे आयोजन करण्यात आले असून शरयू तीरावर आकर्षक आतषबाजी केली जाणार आहे. यात पर्यावरणपूरक आतषबाजीसह डिजिटल आतषबाजीही पाहावयास मिळेल. यंदा प्रथमच नव्या मंदिरात विराजमान प्रभू श्रीराम दीपोत्सवात सहभागी होणार असल्याने अयोध्येत प्रचंड उत्साह आहे. प्रभू श्रीराम श्रीलंकेमध्ये विजय मिळवून त्रेतायुगात अयोध्येत परतले होते. त्या काळातील आनंदी वातावरण यंदा येथे पाहावयास मिळेल.
५०० वर्षांची प्रतीक्षा संपली : मोदीप्रभू श्रीराम तेव्हा १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. मात्र, आज सुमारे ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लाच्या जन्मगावी उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात हजारो दिवे तेवणार आहेत. म्हणून यंदाची ही दिवाळी ऐतिहासिक आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान