शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

Corruption: २८ बँक खात्यात पैसाच पैसा, कॉलगर्ल्सपासून गर्लफ्रेंडपर्यंतचे शौक, सरकारी अधिकाऱ्याचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 8:12 PM

Corruption: जिल्हाधिकारी कार्यालयातील एका करोडपती अधिकाऱ्याच्या लॉकरमधून पैसे आणि मालमत्ता समोर येत आहे. आतापर्यंत त्याच्या २८ बँक खात्यांची माहिती समोर आली आहे.

इंदूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयातील एका करोडपती अधिकाऱ्याच्या लॉकरमधून पैसे आणि मालमत्ता समोर येत आहे. आतापर्यंत त्याच्या २८ बँक खात्यांची माहिती समोर आली आहे. तो सरकारी पैसा त्याच्या पत्नीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करत होतात तसेच दोन नंबरची कमाई मौजमजेवर उडवत होता. त्याने अनेक गर्लफ्रेंड्सशी संबंध ठेवले होते. त्यांच्यावर तो सरकारी पैशांची उधळपट्टी करत होता.

हल्लीच इंदूर कलेक्ट्रेट कार्यालयामध्ये असलेला सरकारी अधिकारी मिलाप चौहान याच्यावर घोटाळ्याचा आरोप लागला होता. प्राथमिक तपासात त्याने केलेला घोटाळा हा एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचा असल्याचे समोर आले होते. कलेक्टरांनी त्याला निलंबित करून तपासासाठी एडीएम राजेश राठोड याच्या नेतृत्वाखाली टीम स्थापन केली होती. त्यामध्ये या सरकारी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचा उलगडा झाला. तसेच त्याने ५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम हडप केल्याचे समोर आले. हा पैसा त्याने २८ बँक खात्यांमध्ये वळवला होता. त्यातील अनेकजण त्याचे नातेवाईक होते. दरम्यान, घोटाळ्याचा हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील मिलाप चौहान हा अधिकारी केवळ १२वी पास आहे. त्याने सरकारी लेखापरीक्षकांच्या दुर्लक्षाचा पुरेपूर फायदा उचलला.  त्याने वेगवेगळ्या २८ खात्यांमध्ये ५ कोटींहून अधिक रक्कम वळवल्याचेही समोर आले. दरम्यान, चौकशीमध्ये त्याने या पैशांमधून केलेल्या उधळपट्टीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. त्याने दिलेली माहिती ऐकून तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. अनौपचारिक चर्चेदरम्यान, त्याने अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याने अनेकदा विमान प्रवास केला आहे. या कमाईतील बरीचशी रक्कम त्याने कॉलगर्ल्स आणि गर्लफ्रेंड्सवरही खर्च केली. तसेच नातेवाईक आणि परिचितांच्या नावावर जमिनीचे सौदेही केले.

एवढा घोटाळा समोर आल्यानंतरही अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच पोलिसांनीही कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. आता ही रक्कम या अधिकाऱ्याकडून कशी वसूल केली जाईल याबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे.    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश