शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

राहुल, सुप्रियासह 28 खासदारांना मिळणार सर्जिंकल स्ट्राईकची माहिती

By admin | Published: October 17, 2016 10:55 AM

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता सर्जिकल स्ट्राईकची माहिती 28 खासदारांना देण्यात येणार आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता सर्जिकल स्ट्राईकची माहिती 28 खासदारांना देण्यात येणार आहे . या 28 जणांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश असणार आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत राहुल गांधी, वरुण गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह 28 खासदारांचा समावेश आहे.
 
लोकसभा सचिवालयाच्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीची मंगळवारी बैठक होईल. या बैठकीत परराष्ट्र सचिव, संरक्षण सचिव आणि लष्करी कारवाईचे महासंचालक (डीजीएमओ) हे खासदारांना सर्जिकल स्ट्राइकबाबत माहिती देतील. संसदीय समितीला अशी माहिती देण्यास सरकारने आधी नकार दिला होता.
 
 
काही दिवसांपुर्वी लष्कराने सर्जिंकल स्ट्राईक कारवाईची माहिती संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीसमोर मांडली होती. या बैठकीस समितीचे तीन सदस्य उपस्थित होते. लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी भारतीय जवानांनी 29 सप्टेंबर रोजी केलेल्या लष्करी कारवाईचा लेखाजोखा सादर केला. त्यावेळी राजकीय पक्षांनाही लष्कराने नियंत्रण रेषा पार करुन केलेल्या सर्जिंकल स्ट्राईकची माहिती दिली. यावेळी लष्कराने गरज पडल्यास पुन्हा सर्जिंकल स्ट्राईक करु असं सांगतिलं होतं. 
 
(सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर करणार नाही - केंद सरकार)
 
नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती त्याच आधारे ही कारवाई करण्यात आली असं लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी समितीला सांगितलं होतं. बिपीन रावत यांनी संपुर्ण कारवाई कशाप्रकारे पार पाडली, कशाप्रकारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, तसंच आपले जवान सुरक्षितरित्या माघारी कसे आले यासंबंधी थोडक्यात माहिती दिली.
 
(पाकिस्तानी वृत्तपत्रातील 'सर्जिकल स्ट्राईक'ची बातमी निराधार)
 
कॉंग्रेस नेते आणि समितीचे सदस्य मधुसुदन मिस्री यांनी या वेळी प्रश्‍न विचारण्याचा प्रयत्न केला; पण पॅनलचे प्रमुख मेजर जनरल बी. सी. खांडुरी (निवृत्त) यांनी याबाबत बोलणे टाळले. या वेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे एका सदस्याने सांगितले. तत्पूर्वी संरक्षण मंत्रालयाचे प्रतिनिधी लक्ष्यभेदी हल्ल्याबाबत स्थायी समितीसमोर आपले म्हणणे मांडणार होते; पण नंतर त्यामध्ये बदल करण्यात आला होता. याला कॉंग्रेसच्या सदस्या अंबिका सोनी आणि मधुसूदन मिस्री यांनी आक्षेप घेतला होता, त्यांनी लष्कराच्या भूमिकेवरही टीका केली होती.