ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 27 - पाकिस्तानच्या नौदल सुरक्षा अधिका-यांनी आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 29 भारतीय मच्छिमारांना गुरुवारी अटक केली आहे.
पाकिस्तान मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या नौदल अधिका-यांनी 29 भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेतले असून त्यांना पुढील कारवाई होईपर्यंत डॉक्स पोलिस ठाण्यात ठेवले आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच, त्यांच्याकडील पाच बोटी सुद्धा पाकिस्तानच्या नौदल अधिका-यांनी जप्त केल्या आहेत.
दरम्यान, पाकिस्तानने गेल्या वर्षी 100 भारतीय मच्छिमारांना अटक केली होती. त्यातील 85 मच्छिमारांना तुरुगांत पाठविले होत. तसेच, त्यांच्याकडील 19 बोटी जप्त केल्या होत्या.