तिरुवनंतपुरम : केरळमध्ये बुधवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत 29 जणांचा बळी घेतला आहे. आशियातील सर्वांत मोठे वक्राकार धरण म्हणून नावाजलेले केरळमधील इडुक्की धरण पावसामुळे भरुन वाहू लागल्याने धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तब्बल 40 वर्षांत पहिल्यांदाच केरळमध्ये अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला असून 54,000 लोक बेघर झाले आहेत.
केरळमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे 29 जणांचा मृत्यू तर 54,000 लोक बेघर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 8:53 AM