कोरोना विषाणूच्या (कोविड−१९) उद्रेकामुळे जगभरातच विमान उद्योग बंद पडल्यासारखा असून, भारतात यावर्षी या उद्योगातील २९.३२ लाखरोजगार संकटात सापडले आहेत, असे इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने (आयएटीए) म्हटले. आयएटीएचे विभागीय उपाध्यक्ष (आशियापॅसिफिक ) कॉनरॅड क्लिफोर्ड यांनी म्हटले की, ‘या भागातील विमान कंपन्यांचा २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत ६१ अब्ज डॉलर्सचा रोखीचा व्यवहार झालाच नाही. या भागात आम्ही पहिल्या विमान कंपनीचा बळी गेल्याचे पाहिले. सरकारने तातडीने या विमान कंपन्यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी पुरेशी रोख रक्कम ओतली नाही, तर आणखीही काही कंपन्या बंद पडण्याची भीती आहे.’क्लिफर्ड यांनी भारत, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि थायलंड या देशांनी प्राधान्याने कृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. कोविड−१९ साथीमुळे जगातील विमान कंपन्यांचा प्रवासी महसूल २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ५५ टक्क्यांनी म्हणजे ३१४ अब्ज डॉलर्सने घसरलेला असण्याची अपेक्षा आहे. आशिया पॅसिफिकमधील विमान कंपन्यांचा महसूल गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वात जास्त म्हणजे ११३ अब्ज डॉलर्सने खाली आलेला असेल.>महसुलात होईल घटआशिया पॅसिफिक देशांत भारतीय विमान उद्योगाला नोक ऱ्यांचा विचार करता फारच मोठा फटका बसेल, असे आकडेवारी सांगते. यामुळे २९लाख ३२ हजार ९०० नोक-यांवर परिणाम होईल, असे आयएएटीएच्या अहवालात म्हटले. भारताचा या क्षेत्रातील महसूलही २०१९ च्या तुलनेत ११.२२१ दशलक्ष डॉलर्सने खाली आलेला असेल. याशिवाय प्रवाशांची मागणीही भारतात ४७ टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे.
CoronaVirus: भारतात हवाई उद्योगातील २९ लाख रोजगार संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 5:57 AM