रायसोनीच्या २९ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2016 12:09 AM
जळगाव : जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या डिप्लोमा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात नुकत्याच परिसरात ठाणे येथील भारत गिअर्स लि. कंपनीने ४२ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात जी. एच. रायसोनी पॉलीटेक्निक डिल्पोमाच्या २१ व अभियांत्रिकीच्या डिप्लोमाच्या ८ अशा २९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. डिप्लोमा ट्रेनी पदासाठीच्या मुलाखतीत धुळे, जामनेर, पारोळा व जळगावच्या ८५ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. निवड झालेल्या विद्यार्थ्याना कंपनीचे अधिकारी आदिनाथ दामले, दीपक गायकवाड यांनी नियुक्ती पत्र दिले. विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, डॉ.प्रीती अगरवाल, प्राचार्य तुषार पाटील व उपप्राचार्य हरीश भंगाळे यांनी अभिनंदन केले. यशस्वीतेसाठी प्रा. नीलेश बाउस्कर, प्रा. विजय कपाई, प्रा.अनंत कामठीकर प्रा.पंकज पाटील यांनी परिश्रम घेतले.