पूँछ : गेल्या काही दिवसांपासून जम्मू- काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या सैन्याने केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराच्या जवानांनी सडेतोर उत्तर दिले आहे. यात पाकिस्तानच्या तीन ते चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी पूँछ जिल्ह्यातील राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. तसेच, मोर्टार हल्ला सुद्धा केला. याला भारतीय लष्काराच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत तीन ते चार पाकिस्तानच्या सैनिकांना ठार केले.
दरम्यान, बुधवारी जम्मू-काश्मीरमधील उरी विभागात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या या गोळीबारात भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले होते. तर एका स्थानिक महिलेचाही मृत्यू झाला होता. यानंतर पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
पाकिस्तानी सैनिकांनी उरी विभागातील चुरुंदा गावच्या दिशेने केलेल्या गोळीबार केला होता. यात नसीमा बेगम या महिलाचा महिलेचा मृत्यू होता. याशिवाय, जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील भागात पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्रभर गोळीबार केला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.