बंगळुरू : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात तीन उपमुख्यमंत्री असतील. असा प्रकार या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. मंत्रिमंडळात आठवडाभरापूर्वी समावेश केलेल्या १७ नव्या मंत्र्यांचे खातेवाटपही येडीयुरप्पांनी सोमवारी जाहीर केले.कर्नाटक मंत्रिमंडळात गोविंद काजरोल, अश्वत्थ नारायण, लक्ष्मण सावाडी हे तीन उपमुख्यमंत्री असतील. त्यापैकी काजरोल यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते व समाजकल्याण, अश्वत्थ नारायण यांना उच्च शिक्षण व माहिती-तंत्रज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान व लक्ष्मण सावडी यांच्याकडे वाहतूक खाते दिलेआहे. बसवराज बोम्मई यांना गृहखाते, माजी मुख्यमंत्री असलेले जगदीश शेट्टार (लघु व मध्यम उद्योग), के. एस. इश्वरप्पा (ग्रामीण विकास) व आर. अशोक (महसूल), बी. श्रीरामुलू (आरोग्य व कुटुंबकल्याण), एस. सुरेश (शिक्षण), व्ही. सोमण्णा (गृह), सी. टी. रवि (पर्यटन), कोटा श्रीनिवास पुजारी (मच्छिमार, बंदरे), जे. सी. मुथ्थुस्वामी (कायदा, संसदीय कामकाज), सी. सी. पाटील (खाण), एच. नागेश (अबकारी), प्रभू चव्हाण (पशूसंवर्धन), शशिकला जोले (महिला व बालकल्याण) याप्रमाणे खाते वाटप केले आहे. (वृत्तसंस्था)तुघलकचे ४५० उपपंतप्रधान!मुहम्मद बिन तुघलक या उत्कृष्ट राजकीय विडंबन असलेल्या तामिळ चित्रपटात असा प्रसंग आहे की, तुघलक पंतप्रधान बनतो. मात्र त्याच्या खासदारांनी पक्ष सोडून जाण्याच्या दिलेल्या धमकीमुळे पेचप्रसंग निर्माण होतो.त्यातून मार्ग काढण्यासाठी मग तुघलक सरकारमध्ये तब्बल ४५० उपपंतप्रधान नेमले जातात.
कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा मंत्रिमंडळात ३ उपमुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 5:04 AM