- सुरेश एस. डुग्गर जम्मू : सुरक्षादलांनी शोपियानमध्ये मंगळवारी हिज्बुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेच्या तीन अतिरेक्यांना ठार मारले. त्यातील एक जिल्हा कमांडर होता.दक्षिण काश्मीरमधील शोपियान भागात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी तुर्कवंगम भागात सकाळी त्यांचा शोध सुरू केला. शोध सुरू असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केल्यावर सुरक्षादलांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यात तीन अतिरेकी मारले गेले. घटनास्थळावरून दोन एके रायफल्स आणि एक इन्सास रायफल ताब्यात घेण्यात आली.मरण पावलेल्यांमध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा जिल्हा कमांडर जुबेर अहमद, कामरान मन्हास आणि मुनीर उल इस्लामचा समावेश आहे.ही चकमक सकाळी पाचच्या सुमारास सुरू झाली. चकमकीत सीआरपीएफ आणि स्पेशल आॅपरेशन ग्रुपच्या संयुक्त तुकडीचा सहभाग होता. सकाळी साधारण साडेसहा वाजता गोळीबार थांबल्यावर शोध घेतल्यावर तीन अतिरेक्यांचे मृतदेह हाती लागले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या महिन्यात काश्मीरमध्ये एकूण २३ अतिरेकी मारले गेलेत्न त्यात सगळ्यात जास्त १७ शोपियानमध्ये मारले गेले. काश्मीरमध्ये यावर्षी १०९ अतिरेकी ठार मारण्यात आले. त्यात सगळ्यात जास्त हिज्बुल मुजाहिदीनचे स्थानिक अतिरेकी होते.
शोपियानमध्ये चकमकीत हिज्बुलचे ३ अतिरेकी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 3:15 AM