नवी दिल्ली : केंद्र सरकारने केनियातील दहा तरुणींची सुटका केली आहे. यामध्ये 3 भारतीय आणि 7 नेपाळच्या तरुणींचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून दिली.सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, केनियामध्ये अडकलेल्या 3 भारतीय तरूणींची सुटका केली आहे. 3 भारतीय तरूणींसह 7 नेपाळी तरुणींची देखील सुटका करण्यात आली आहे. मानवी तस्करीत अडकलेल्या या तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यांना केनियाहून परत आणण्यात आले आहे. केनियातील मोम्बासा येथे कैद असलेल्या या तरुणींचे पासपोर्ट आणि मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत.