नवी दिल्ली - 'आर्मी डे'निमित्त आयोजित करण्यात आलेल्या परेडसाठीचा सराव करत असताना झालेल्या अपघातात तीन जवान थोडक्यात बचावले आहेत. ध्रुव हेलिकॉप्टरमधून उतरताना दोरखंड अचानक तुटल्यानं उंचावरुन तीन जवान जमिनीवर कोसळले. या घटनेत जवान जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. 9 जानेवारीची ही घटना आहे. दरम्यान, हा अपघात नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
ज्यावेळी भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली होती. या ऑपरेशनदरम्यान ध्रुव हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. नियंत्रण रेषेपलिकडे गेलेल्या भारतीय सैनिकांच्या वापसीसाठी सीमेजवळ हे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. ध्रुव हेलिकॉप्टर हे देशी बनावटीचे आहे.
2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक...सप्टेंबर 2016मध्ये सर्जिकल स्ट्राईक करत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यावेळी एकाही भारतीय जवानाला दुखापत झाली नव्हती. अत्यंत शूरपणे भारतीय जवान पाकिस्तानच्या सीमेत घुसले होते. यावेळी जवानांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याने दहशतवाद्यांवर चांगलीच जरब बसली. दरम्यान, सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या जवानांचा किर्ती चक्राने सन्मान करण्यात आला.
लष्कराकडे दहा दिवस लढण्याइतपत शस्त्रसाठा - कॅगभारताच्या संरक्षणव्यवस्थेविषयी गंभीर चिंता उत्त्पन्न करणारे दोन अहवाल महालेखापरिक्षकांकडून (कॅग) प्रकाशित करण्यात आले आहेत. कॅगच्या अहवालानुसार भारतीय लष्कराला सध्या मोठ्याप्रमाणावर शस्त्रास्त्रांचा तुटवडा भासत असून, यदाकदाचित युद्धप्रसंग उद्भवल्यास लष्कराकडे फक्त 10 दिवस पुरेल इतकाच शस्त्रसाठा असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.