शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी प्रचार करत आहेत", अजित पवार जाब विचारणार...
2
जपानचा सत्ताधारी पक्ष निवडणूक हरला; तरीही शिगेरू इशिबा पुन्हा पंतप्रधान बनले, कसे?
3
"इथल्या आमदारावर काय अन्याय झाला, बिल्डरांच्या कृपेने..."; राज ठाकरेंची प्रकाश सुर्वेंवर खरमरीत टीका
4
'तेव्हा' बंद खोलीत नेमकं काय घडलं? राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या मर्मावरच बोट ठेवलं! केला रोखठोक सवाल
5
"माझं ग्रहमान ठीक नाही"; सुजय विखेंच्या विधानावर जयश्री थोरात म्हणाल्या, "तुमची रेसिपी चुकली"
6
“माझ्याकडून एकच गोष्ट झाली नाही अन् ती म्हणजे...”; कबुली देत राज ठाकरेंचे मोठे विधान
7
“सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या 'एक हैं तो सेफ है' ला मविआचे जशास तसे प्रत्युत्तर; दिला "हम सब नेक है..." चा नारा
10
‘काँग्रेस अध्यक्ष फक्त नावाचेच हिंदू...’, खरगेंच्या 'त्या' वक्तव्यावर आचार्य प्रमोद कृष्णम संतापले
11
“बॅग तपासली म्हणून इश्यू करण्याची गरज नाही, पोलिसांचा तो अधिकार”: प्रकाश आंबेडकर
12
"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार
14
शरद पवार म्हणाले जातीवाद केल्याचे उदाहरण द्या; राज ठाकरेंनी भुजबळांच नाव घेत म्हटलं, "पुणेरी पगडी..."
15
Video : भाजपची निवडणूक आयोगात धाव; राहुल गांधींविरोधात दाखल केली तक्रार, कारण...
16
वडोदराच्या IOCL रिफायनरीत स्फोटानंतर भीषण आग; बचावकार्य सुरू
17
“राज्यात महाविकास आघाडी जिंकली, तर दिल्लीतील मोदींची सत्ताही जाईल”; नाना पटोलेंचे भाकित
18
मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई; पोलीस ठाण्यावर हल्ला करणारे ११ अतिरेकी ठार
19
'त्या' महिला ठाकरे गटाच्या पदाधिकारी?; माहीम कोळीवाड्यातील प्रकारात वेगळाच ट्विस्ट
20
एका छोट्या भूमिकेसाठी १ वर्ष पोस्टपोन केलं होतं '३ इडियट्स'चं शूटिंग, दिग्दर्शक हिराणी म्हणाले...

काश्मिरात ३ जवान शहीद

By admin | Published: February 15, 2017 3:12 AM

काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील चकमकीत मंगळवारी एक दहशतवादी मारला गेला, तर तीन सैनिक शहीद झाले. हाजीन भागातील

श्रीनगर : काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील चकमकीत मंगळवारी एक दहशतवादी मारला गेला, तर तीन सैनिक शहीद झाले. हाजीन भागातील या चकमकीत सहा जवान आणि एक नागरिक असे सात जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दहशतवादी असलेल्या भागाची सुरक्षा दलांनी नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू करताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला, तेव्हा चकमकीला तोंड फुटले. दहशतवाद्यांनी घरातून केलेल्या गोळीबारात नऊ जवान जखमी झाले. त्यापैकी तिघांचा नंतर मृत्यू झाला. या मोहिमेत एक दहशतवादी मारला गेला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मोहिमेदरम्यान, सीआरपीएफच्या ४५ व्या बटालियनचे कमांडिंग आॅफिसर चेतनकुमार चिता यांना अनेक गोळ्या लागल्या आहेत.जम्मू : सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एका भुयाराचा छडा लावल्यामुळे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. भुयार प्रतिबंधक मोहिमेदरम्यान बीएसएफने सोमवारी रामगड सेक्टरमध्ये भारतीय सीमेच्या आत २० मीटर लांबीच्या भुयाराचा छडा लावला. त्यामुळे पाकचे मनसुबे उधळले गेले आहेत. या भुयाराची रुंदी अडीच फूट आहे. या भुयाराचे दुसरे टोक पाकिस्तानात आहे. भुयार पूर्णपणे तयार झाले नव्हते. तत्पूर्वीच त्याचा छडा लावण्यात आल्यामुळे दहशतवाद्यांचे मनसुबे उधळले गेले आहेत. (वृत्तसंस्था)