पाली : राजस्थानमधील पाली येथील घटनेचे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. इथे एका निष्पाप मुलाच्या मृत्यूने दु:खी होऊन संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी घेत जीवन संपवले आहे. टाकीत उडी मारलेल्या दाम्पत्याचा आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर या कुटुंबात एकच मुलगी उरली आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी ती शाळेत गेली होती. या घटनेची माहिती समोर येताच एकच खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांना धक्का बसला. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पाली जिल्ह्यातील रोहट पोलीस स्टेशन परिसरातील सांझी या गावातील आहे. खरं तर इथे एकाच कुटुंबातील 3 जणांनी आत्महत्या केली आहे. या गावातील भल्लाराम मेघवाल यांचा मुलगा भीमराव मागील काही काळापासून आजारी होता. बुधवारी त्यांची पत्नी आणि मुलगी भल्लारामला डॉक्टरला दाखवण्यासाठी रोहट येथील रुग्णालयात जात होते. दरम्यान, त्यांचा तीन वर्षांचा एकुलता एक मुलगा भीमराव वाटेतच मरण पावला. यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.
मुलाच्या मृतदेहासह मारली उडी दरम्यान, तेथून ते गावाकडे परतायला लागले. तणावाखाली संपूर्ण कुटुंबाने निष्पाप मुलाच्या मृतदेहासह गावाजवळील टाकीत उडी घेतली. यामुळे भल्लाराम आणि त्यांच्या पत्नीसह पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रोहट पोलीस ठाण्याचे प्रभारी उदय सिंग पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी सापडली सुसाईड नोटपोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढले. याच टाकीजवळ मृत भल्लाराम यांची गाडी उभी होती. भल्लाराम यांचे जॅकेट त्यांच्या दुचाकीवर ठेवले होते. भल्लाराम यांची सुसाईड नोट त्याच जॅकेटमध्ये ठेवण्यात आली होती. त्यात त्यांनी आत्महत्येचे कारण सांगितले आहे. मात्र, आत्महत्येमागील कारणाबाबत पोलीस सध्या काहीही सांगत नाहीत. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण रोहट परिसरात शोककळा पसरली आहे. मृत भल्लाराम मेघवाल यांच्या घरात पाच सदस्यांपैकी फक्त एक आठ वर्षांची मुलगी उरली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"