३० लाख सरकारी नोकऱ्या देणार; काँग्रेसची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 10:23 AM2024-03-07T10:23:11+5:302024-03-07T10:24:51+5:30
यामध्ये रोजगार, महागाईपासून दिलासा आणि सामाजिक न्यायावर विशेष भर देण्यात आला असून, ३० लाख सरकारी नोकऱ्यांची हमी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.
नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केला आहे. काँग्रेस कार्यकारिणीने (सीडब्ल्यूसी) मंजूर केल्यानंतर येत्या काही दिवसांत तो प्रसिद्ध केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. यामध्ये रोजगार, महागाईपासून दिलासा आणि सामाजिक न्यायावर विशेष भर देण्यात आला असून, ३० लाख सरकारी नोकऱ्यांची हमी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.
काय आहेत आश्वासने... -
- अग्निपथ योजना बंद करणार.
- पेपरफूट प्रकरणासाठी कडक कायदे.
- जॉब कॅलेंडर जारी करणार
- सरकारी परिक्षेचा फॉर्म मोफत
- पदवी, पदविका मिळविलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्यवृद्धीसाठी भत्ता.
- रोहित वेमुला याच्या नावाने कायदा.
- खेळाशी संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
- महिलांसाठी दरमहा ६ हजार रुपये
- नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण
- गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपये
- कोर्टात महिलांची संख्या वाढविणार
- स्वस्तात गॅस सिलिंडर
- जातनिहाय जनगणना
- ओबीसी आरक्षण वाढवणार
- एमएसपीनुसार दर
- सर्वांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार