Manipur Violence: गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये प्रचंड हिंसा भडकली आहे. हिंसाचार कमी करण्यासाठी केंद्राने राज्यात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. या हिंसाचारादरम्यान अनेक ठिकाणी बलात्कार, खुन यांसारख्या घटना घडल्या आहेत. आता प्रशासनाकडून या गुन्ह्यांची माहिती देणारी रिपोर्ट समोर आली आहे.
सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या या स्टेटस रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, आतापर्यंत सामूहिक बलात्कार आणि हत्येची एक तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर बलात्काराच्या तीन तक्रारी आहेत. मणिपूर हिंसाचार प्रकरणांमध्ये एफआयआरची सर्वाधिक संख्या 4694 आहे, ज्यामध्ये हत्येसाठी 72 एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. मणिपूर सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अधिकृत अहवालात ही आकडेवारी दाखवण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये एफआयआरची कमाल संख्या - 4694
1. खून 302/304 - मर्डर ---72
२. बलात्कार 376/376डी - बलात्कार/सामूहिक बलात्कार---3
3. खून आणि बलात्कार 302/304 - खून आणि 376 - बलात्कार - 01
4. विनयभंग 354- स्त्रीचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर प्राणघातक हल्ला किंवा शक्तीचा वापर - 06
5. जाळपोळ 436/435 - आग किंवा स्फोटक पदार्थ (जाळपोळ) - 4454
6. दरोडा --4148
7. घराच्या मालमत्तेचे नुकसान -- 4694
8. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान / पीडीपीपी कायदा - सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान - 584
9. धार्मिक स्थळांचा नाश किंवा पूजास्थळांची विटंबना-- 46
10. गंभीर दुखापत - 100