श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात लष्कराने आज दहशतवाद्यांविरोधात आज पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. अवंतीपोरा भागात झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
काश्मीर मुद्द्यावरून सैरभैर झालेल्या पाकिस्ताननं नियंत्रण रेषे(Line Of Control)जवळ जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्ताननं नियंत्रण रेषे(Line Of Control)जवळ रणगाडे पाठवले आहेत. तसेच आपल्या स्पेशल फोर्सच्या 100 कमांडोंनादेखील तैनात केलं आहे. त्यामुळे पाकिस्तान भारताविरोधात मोठी कारवाई करण्याच्या विचारात तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे पाकिस्तानकडून होणाऱ्या कुठल्याही आगळिकीला भारतीय लष्कर उत्तर देण्यास समर्थ असल्याचं लष्करानं सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननं गुजरातल्या नियंत्रण रेषेजवळील स्वतःच्या भागात एसएसजी कमांडो तैनात केले होते. इक्बाल-बाजवा पोस्टवर पाक कमांडो ठेवले होते. कलम 370 जम्मू-काश्मीरमधून हटवल्यानंतर पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकत सुटला आहे. तसेच नियंत्रण रेषेवरही वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहेत.
भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल मोठी कारवाई केली होती. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील तांगधर सेक्टरमध्ये घुसून कारवाई सुरू केली आहे. यावेळी जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. तसेच, उखळी तोफांचा मारा केला होता. यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने मोठा दणका दिला होता.
पाकव्याप्त काश्मीरमधून 500हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीतपाकव्याप्त काश्मीरमधून 500 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिली आहे. PoKमधल्या नियंत्रण रेषेजवळ विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये 500 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीची संधी शोधत आहेत. तसेच 200 ते 300 दहशतवादी पाकिस्तानच्या मदतीनं या क्षेत्राला अशांत ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्येच सक्रिय आहेत.