श्रीनगर:भारतीय लष्करानं गुरुवारी एलओसीवर उरीजवळील रामपूर सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दहशतवाद्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. दरम्यान, सुरक्षा दलाने ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून 5 AK -47 रायफल, 8 पिस्तूल आणि 70 ग्रेनेड आणि पाकिस्तानी चलन जप्त केलं आहेत.
इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान कोसळलं शाळेचं छत, 25 मुलांसह तिघे गंभीर जखमी
3 ठार तर 3 दहशतवाद्यांचा शोध सुरू
चिनार कॉर्प्सचे कमांडर जनरल डीपी पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूर सेक्टरच्या हातलंगा जंगलात 6 दहशतवादी लपल्याची बातमी मिळाली होती. यानंतर रामपूर सेक्टरमध्ये मागील 4 दिवसांपासून शोधमोहीम सुरू होती. गुरुवारी पहाटे हातलंगा जंगलात संशयास्पद हालचाल दिसून आल्या. दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू झाला, प्रत्युत्तरात सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. पण, इतर तिघे पळून गेले, त्यांचा सध्या शोध सुरू आहे.
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, शस्त्र आणि स्फोटकांसह 3 दहशतवादी अटक
दहशतवादी अनायत अहमद दार ठार
या कारवाईच्या काही तास आधी दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील चित्रगाम गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्या चकमकीत अनायत अहमद दार नावाचा दहशतवादी ठार झाल्याचं जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं. हा तोच परिसर आहे जिथे बुधवारी संध्याकाळी उशिरा दहशतवाद्यांनी एका नागरिकाला जखमी केलं होतं.