टॉरंट म्हणजे काय ?टॉरंट हे बिटटॉरंट तंत्रज्ञानाचा एक भाग आहे. बिटटॉरंट हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर करून मोठ्या फाईल साईज असलेल्या फाइल्स अगदी सहज डाउनलोड करता येतात .समजा तुम्ही एखाद्या टॉरंट वेबसाईट वरून एखादी मोठी फाईल जसे कि चित्रपट किंवा एखादे सॉफ्टवेअर डाउनलोड करत आहात आणि मध्ये तुम्हाला पॉज करावे लागले किंवा पॉज झाले तर या बिटटॉरंट तंत्रज्ञानामुळे तुमची फाईल डाउनलोड ज्या ठिकाणी पॉज झाली तिथून पुढे तुमची फाईल डाउनलोड व्हायला सुरु होते. अर्थात बिटटॉरंट तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट वरून डाउनलोड करणे इतर डाउनलोडच्या मानाने अधिक सोपे झाले त्यामुळे बिटटॉरंट तंत्रज्ञान अल्पावधित नेट प्रेमींमध्ये खूप लोकप्रिय झाले .
फरक काय ?बिटटॉरंट तंत्रज्ञान अल्पावधित नेट प्रेमींमध्ये खूप लोकप्रिय होण्याचे मुख्य कारण म्हणजे डाउनलोड स्पीड. जेव्हा आपण इतर वेबसाईट वरून एखादी फाईल डाउनलोड करतो तेव्हा आपण त्या वेबसाईट च्या सर्वर ला डायरेक्ट कनेक्ट होतो. त्यामुळे जर आपल्याप्रमाणे अनेक लोक त्या वेबसाईटला कनेक्ट होऊन फाईल्स डाउनलोड करत असतील तर अर्थातच सर्वर वर लोड येईल आणि डाउनलोड स्लो होईल . मात्र बिटटॉरंट तंत्रज्ञान हे पी टू पी प्रोटोकॉल वर काम करत असल्यामुळे जे लोक टॉरंट साईट वरून सतत फाईल अपलोड आणि डाउनलोड करतात पी टू पी प्रोटोकॉल त्यांचा काम्पुटर आपल्या नेटवर्क मध्ये घेतो व इतरांना फाईल्स डाउनलोड करण्यासाठी त्यांच्या कॉम्पुटरचा ऍड्रेस देतो. म्हणजे तुमचा कॉम्पुटर हा टॉरंट वेबसाईट चा सर्वर म्हणून काम करतो. असे लाखो कॉम्प्युटर्स टॉरंट साईटच्या नेटवर्क मध्ये ऍड झालेले आहेत. त्यामुळे एकच फाईल जरी हजारो लोकांनी एकाच वेळी डाउनलोड केली तरी काही फरक पडत नाही कारण प्रत्येक डाउनलोड साठी वेगवेगळा सर्वर वापरला जातो.
मग प्रॉब्लेम कुठे आहे ?टॉरंट वेबसाईट चा वापर प्रॉमुख्याने फाईल शेरिंग साठी केला जातो . मात्र याचा गैरवापर अधिक होऊ लागला जसे कि चित्रपट किंवा सॉफ्टवेअर किंवा टीव्ही वरील कॉपीराईट कंटेन्ट मोठ्या प्रमाणावर शेअर होऊ लागले त्यामुळे या क्षेत्रातील व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होऊ लागला.तसेच टॉरंट वेबसाईटचा वापर करून हॅकर अनेक कॉम्प्युटर्स हॅक करण्याच्या घटना देखील घडू लागल्या त्यामुळे अर्थातच टॉरंट वेबसाईटच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होऊ लागली . त्यामुळे भारतासहित अनेक देशात अनेक टॉरंट वेबसाईटस वर बंदी घातली गेली .