शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शेतकऱ्यावर जबरदस्ती केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास; MSP वर पंजाब विधानसभेत प्रस्ताव

By हेमंत बावकर | Published: October 20, 2020 12:31 PM

Farmer bill Against Central Government in Punjab : या प्रस्तावामध्ये केंद्र सरकारद्वारे आणण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांवर टीका करण्यात आली आहे. येथे प्रस्ताव मांडल्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर यांनी सांगितले की, तीन कृषी कायद्यांसह वीज बिलांमध्ये जो बदल करण्यात आला आहे, तो देखील शेतकरी आणि मजुरांच्या विरोधात आहे. याचा परिणाम केवळ पंजाबमध्येच नाही तर हरियाना आणि पश्चिम उत्तर प्रदेशवर होणार आहे. 

ठळक मुद्देविधानसभेमध्ये केंद्राच्या कायद्याविरोधात तीन नवीन विधेयक मांडण्यात आले आहेत. पंजाब मुख्यमंत्र्यांनी रेल्वे रुळांवर बसलेल्या शेतकऱ्यांना धरणे आंदोलन करणे थांबविण्याचे आवाहन केले आहे. या प्रस्तावात केंद्राला नवीन अध्यादेश आणण्याचे सांगण्यात आले आहे. या नव्या अध्यादेशात MSP ला सहभागी करावे.

केंद्र सरकारद्वारे गेल्या महिन्यात आणण्यात आलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. याचे केंद्रस्थान पंजाब, हरियाणा आहे. अशातच पंजाब सरकारने विधानसभेत या कायद्याविरोधात प्रस्ताव संमत केला आहे. असे करणारे पंजाब पहिले राज्य बनले आहे. मंगळवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हा प्रस्ताव मांडला. 

या प्रस्तावानुसार राज्यात जर शेतकऱ्याचा शेतमाल एमएसपीपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी जबरदस्ती केली तर असे करणाऱ्याला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तसेच कोणत्या कंपनी किंवा व्यक्तीद्वारे शेतकऱ्यांची जमीन, उत्पादनावर दबाव टाकण्यात आला तर त्यांना मोठा दंड आणि तुरुंगवासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 

या प्रस्तावामध्ये केंद्र सरकारद्वारे आणण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांवर टीका करण्यात आली आहे. येथे प्रस्ताव मांडल्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर यांनी सांगितले की, तीन कृषी कायद्यांसह वीज बिलांमध्ये जो बदल करण्यात आला आहे, तो देखील शेतकरी आणि मजुरांच्या विरोधात आहे. याचा परिणाम केवळ पंजाबमध्येच नाही तर हरियाना आणि पश्चिम उत्तर प्रदेशवर होणार आहे. 

महत्वाचे म्हणजे विधानसभेमध्ये केंद्राच्या कायद्याविरोधात तीन नवीन विधेयक मांडण्यात आले आहेत. जे केंद्राच्या कायद्यापेक्षा खूप वेगळे आहेत. यामध्ये एमएसपीला महत्व देण्यात आले आहे. पंजाब मुख्यमंत्र्यांनी रेल्वे रुळांवर बसलेल्या शेतकऱ्यांना धरणे आंदोलन करणे थांबविण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या कामावर परत जावे आम्ही केंद्राच्या कायद्यांविरोधात कायदेशील लढा लढणार आहोत. 

या प्रस्तावात केंद्राला नवीन अध्यादेश आणण्याचे सांगण्यात आले आहे. या नव्या अध्यादेशात MSP ला सहभागी करावे. तसेच सरकारी संस्थांच्या प्रक्रिया मजबूत करावे. कॅप्टन अमरिंदर यांनी या दरम्यान सर्वांना आवाहन करताना म्हटले की, राजकीय पक्षांनी यासाठी एकत्र यायला हवे. अमरिंदर यांनी यावेळी आपवरही टीका केली. काही लोक विधानसभेतच रात्र काढत आहेत. कोणी ट्रॅक्टरवर येत आहे, अशाने काही होणार नाही. आंदोलनाने काही फायदा होणार नाही, जोपर्यंत आपण केंद्राच्या विरोधात एकजूट होऊन लढत नाही. आता या नव्या विधेयकाच्या आधारावर राज्य सरकार पुढील कायदेशीर लढाई लढेल. 

टॅग्स :PunjabपंजाबFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकार