कोरोना व्हायरस महामारीमध्ये जग आशेने पाहत असलेली बाब म्हणजे कोरोनावरील व्हॅक्सीन कधी येणार? ऑक्सफर्ड विद्यापीठ या लसीसाठी जगासमोर मोठा आशेचा किरण ठरली आहे. भारतातही या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या व्हॅक्सीनचे उत्पादन केले जाणार आहे. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट याचे उत्पादन करणार आहे. यावर पुनावाला यांनी मोठा खुलासा केला आहे. (Corona Vaccine )
कोरोनावरील ही लस या वर्षाच्या शेवटी य़ेणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर सीरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी मोठा खुलासा केला आहे. टुडे नेटवर्कला आज ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लस प्रकल्पाचे संचालक अँड्र्यू जे पोलार्ड आणि पुनावाला यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी पुनावाला यांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. (Serum Institute)
पोलार्ड यांनी सांगितले की, अँटीबॉडी रिस्पॉन्सवरून समजते की, ही लस खूप उपायकारक आहे. चाचण्यांमध्ये हे समोर आले आहे. मात्र, आम्हाला ही लस कोरोना व्हारसपासून वाचवू शकते याचे पुरावे हवे आहेत. या लसीची चाचणी वेगवेगळ्या लोकांवर केली जाणार आहे. याचा अभ्यास केला जाईल, त्याचे दुसऱ्या लोकांवरील परिणाम पाहिले जातील.
कोरोना लस बनविणे आणि जगभरात पुरविणे हे मोठे आव्हान असणार आहे. अमेरिका आणि चीनमध्येही यावर काम सुरु आहे. यामध्ये प्रतिस्पर्धा आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी आम्ही याकडे प्रतिस्पर्धा नाही तर सामूहिक प्रयत्न म्हणून पाहत आहोत. आम्ही आमचे अनुभव जगभरातील संशोधकांशीही आदानप्रदान करतो. कारण मिळून कोरोनाशी लढता येईल, असे पोलार्ड म्हणाले.
यानंतर आदार पुनावाला यांनी सांगितले की, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रकल्पामध्ये कोरोनाचे उत्पादन सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. मोठ्या प्रमाणावर या व्हॅक्सीनचे उत्पादन केले जाणार आहे. यासाठी या आठवड्यात आम्ही परवानगी घेण्यासाठी जाणार आहोत. डिसेंबरपर्यंत ऑक्सफर्डच्या Covishield चे 300-400 दशलक्ष डोस बनविले जाणार आहेत.
किंमत किती? कोरोना लसीची किंमत भारतासाठी 1000 रुपयांच्या आसपास असेल असे पुनावाला यांनी सांगितले. जग कोरोनाशी लढत आहे, यासाठी आम्ही या लसीची किंमत कमी ठेवणार आहोत. सुरुवातीला जास्त फायदा पाहिला जाणार नाही. लसीची मागणी प्रचंड असणार आहे. यासाठी आम्हाला लसीचे उत्पादन आणि वितरणाची खूप गरज लागणार आहे. सरकारी यंत्रणेवर सारे अवलंबून असणार आहे, असे ते म्हणाले. याआधी कोणत्याही लसीसाठी एवढी मेहनत करावी लागली नाही. आम्ही कोरोना लसीमुळे अन्य कोणत्याही उत्पादनावर लक्ष देऊ शकलो नाही. कोरोनाचे वाढते संकट पाहता पुढील दोन तीन वर्षे या लसीवरच फोकस करावा लागणार आहे. कारण सर्व जग या महामारीच्या विळख्यात आले आहे, असेही पुनावाला म्हणाले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चीन एक पाऊल पुढे? कोरोना लसीचा दुसरा टप्पा यशस्वी; लान्सेंटमध्येच प्रसिद्धी
अखेर स्वस्तातला OnePlus Nord 5G लाँच; जाणून घ्या भारतातील किंमत
चांदी चकाकली! सोन्याच्या किंमतीतही बदल; जाणून घ्या दर
Kia लवकरच छोटी एसयुव्ही लाँच करणार; जाणून घ्या किंमत किती असणार
करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...
4-5 लोकांकडेच बॉलिवूडचा कंट्रोल; गोविंदाने केले गंभीर आरोप
कर्मचारी कपात! देशातील सर्वात मोठी विमान कंपनी हवालदिल; 10 टक्के नोकऱ्या जाणार