नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (17 सप्टेंबर) आपला 70 वा वाढदिवस साजरा केला. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपाकडूनही वाढदिवसाची जोरदार तयारी करण्यात आली होती. देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाला आहे. यामध्ये भाजपाचे तब्बल 30 कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपाचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये भाजपाच्या वतीने नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात येत होता. अंबात्तूर परिसरात होत असलेल्या या कार्यक्रमात जवळपास दोन हजार हेलियम गॅसचे फुगे हे आकाशात सोडण्यात येणार होते.
हेलियम गॅसच्या फुग्यांचा मोठा स्फोट
फुगे आकाशात सोडण्याची जोरदार तयारी सुरू होती. मात्र त्याच दरम्यान अचानक स्फोट झाला आहे. तसेच भाजपाचे कार्यकर्ते या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेतेमंडळींचं स्वागत केलं जात होते. फटाके फोडण्यात येत होते. त्यावेळी हेलियम गॅसच्या फुग्यांचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबते वृत्त दिले आहे.
भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...
भाजपाच्या एका मंत्र्यांनी सरकारी गाडीवर उलटा तिरंगा लावल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला जात असताना गाडीवर उलटा तिरंगा पाहायला मिळाला आहे. मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांच्या सरकारी गाडीवर झेंडा लावला होता. मात्र तो उलटा होता. मिळालेल्या माहितीनुसार, देवास येथे एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते.
उषा ठाकूर यांनी चूक केली मान्य
उषा ठाकूर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र त्यांच्या सरकारी गाडीवर उलटा तिरंगा लावल्याची बाब प्रसारमाध्यमांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने ही गोष्ट मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर सुरुवातीला ठाकूर यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र माफी मागितली. तसेच त्यानंतर सरकारी गाडीवर लावण्यात आलेला उलटा तिरंगा त्यांच्या ड्रायव्हरने सरळ केला. उषा यांची गाडी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्ता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आली होती. देवासमध्ये जेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा उषा ठाकूर यांनी देखील आपली चूक मान्य केली.
महत्त्वाच्या बातम्या
मोठी कारवाई! अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट
कुत्र्यावरून दोन गटात तुफान 'राडा', अनेकजण जखमी; गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
मनसे आणि शिवसेना संघर्ष पुन्हा पेटणार; ठाणेकरांना दिलेली आश्वासन पूर्ण करा अन्यथा...
"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला
Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल