३०... कोराडी... आत्महत्या
By admin | Published: January 31, 2015 12:34 AM
(फोटो-दोन पासपार्ट)
(फोटो-दोन पासपार्ट)चिमुकलीसह आईची आत्महत्या सुरादेवी येथील घटना : दोघींचाही उपचारादरम्यान मृत्यू कोराडी : आईने स्वत:च्या व दोन वर्षीय चिमुकलीच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. यात गंभीर जखमी झालेल्या या माय-लेकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरादेवी येथे शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. वनिता राजेश कवाडे (३०, रा. सुरादेवी) व मीमांशा राजेश कवाडे (२, रा. सुरादेवी) असे मृत आई व चिमुकलीचे नाव आहे. वनिता ही खापरखेडा येथील रहिवासी विजय नोनीगोपाल नाग यांनी मुलगी होय. वनिता व राजेश यांचा प्रेमविवाह असून, त्यांनी १५ फेब्रुवारी २०१२ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर काही दिवसातच या दोघांमध्ये वाद उद्भवायला सुरुवात झाली. त्यातच मीमांशाचा जन्म झाला. काही दिवस बरे गेल्यानंतर सासरच्या मंडळीकडून त्रास वाढायला लागला. त्यामुळे वनिताने पोलिसांच्या महिला सेलमध्ये तक्रार नोंदविली होती. पती-पत्नीचा संसार गुण्यागोविंदाने चालावा यासाठी महिला सेलमधील पोलीस अधिकाऱ्यांनी त्या दोघांमध्ये आपसी समझोता घडवून आणला होता. राजेशला त्याच्या घरी वनिताच्या माहेरच्या मंडळींचे येणे-जाणे नको होते. त्यामुळे समझोत्याच्या वेळी त्याने तसे शपथपत्र लिहून घेतल्याचे वनिताचा भाऊ विवेक नाग (३०, रा. खापरखेडा, ता. सावनेर) यांनी सांगितले.दरम्यान, शुक्रवारी सकाळी घरी सर्व सुरळीत सुरू असताना राजेशच्या घरातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे वनिताची मोठी जाऊ प्रियंका मनोज कवाडे हिच्या लक्षात आले. तिने लगेच आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी गोळा झाले. घराचे दार आतून बंद असल्याने शेजाऱ्यांनी लगेच दार तोडले. तेव्हा त्यांना वनिता व मीमांशा जळालेल्या अवस्थेत खाली पडल्या असल्याचे आढळून आले. त्यावेळी घरी या दोघींव्यतिरिक्त कुणीही नव्हते. शेजाऱ्यांनी लगेच कोराडी पोलिसांना सूचना दिली आणि या दोघींनाही उपचारार्थ नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान, चिमुकली मीमांशा व तिचा आई वनिताची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, सदर घटनेची माहिती मिळताच वनिताचा भाऊ विवेक नाग यांनी वनिताचा पती राजेश कवाडे व अन्य जणांविरुद्ध कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल धानोरकर करीत आहे.