छत्तीसगड- नीरव मोदी प्रकरणात छत्तीसगड विधानसभेतील काँग्रेसच्या 30 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेले आमदार हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या विरोधात सभागृहात विरोध प्रदर्शन करत होते. राज्यात गुंतवणूक करणा-या रमन सिंह यांच्या मालकीच्या मेटल्स अँड मायनिंग कॉर्पोरेशननं रिओ टिंटो कॉर्पोरेशनला आमंत्रण दिल्याचा कारणावरून विरोधक आमदारांनी छत्तीसगड विधानसभेत मोठा गोंधळ घातला.रिओ टिंटो कॉर्पोरेशनचं पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी यांच्याबरोबर लागेबांधे असल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. दुसरीकडे नीरव मोदीवर 114 अब्ज रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला जातोय. नीरव मोदीनं 17 बँकांमध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप होतोय. नीरव मोदीनं हवाला रॅकेटसाठी या पैशाचा वापर केल्याचीही शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
47 वर्षीय नीरवचे वडील देखील हिरे व्यापारीच होते. नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला. नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.मल्ल्यापेक्षाही मोठा घोळयाबाबत सीबीआयच्या सूत्रांनी स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. मात्र आधी २८० कोटी रुपये व आता ११,५०० कोटी रुपये, या दोन्ही घोटाळ्यांची कार्यपद्धती सारखीच आहे. त्यामुळे आता सीबीआयने या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. हा विजय मल्ल्यापेक्षाही मोठा बँक घोटाळा आहे, असे सांगण्यात आले. तीन बँका संकटातया घोटाळ्यात संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्जे घेतल्याचे पंजाब नॅशनल बँकेने पत्रात नमूद केले आहे. अन्य बँकांमध्ये अलाहाबाद बँक, युनियन बँक आॅफ इंडिया व खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेचा समावेश असल्याचे बोलले जाते. सर्वसामान्यांची रक्कम धोक्यातपीएनबीमध्ये रिझर्व्ह बँक व सर्वसामान्य ठेवीदार यांच्यामार्फत पैसा येतो. समभागधारकांचाही पैसा बँकेत आहे. घोटाळ्याची तक्रार करताना बँकेने ‘संशयास्पद व्यवहार’ असा उल्लेख केला आहे. ही खाती सर्वसामान्य ठेवीदारांची असून घोटाळा केलेल्यांची नावेही बँकेला माहीत नाहीत.