लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तुघलकाबाद भागातील कंटनेर डेपोमधील एका कंटेनरमधून रसायनाची गळती झाल्यामुळे नजीकच्या दोन शाळांमधील ३00 विद्यार्थिनींना विषबाधा झाली. बाधित विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.राणी झांशी स्कूल आणि गव्हर्नमेंट गर्ल्स सिनिअर सेकंडरी स्कूल अशी या शाळांची नावे आहेत. रसायनामुळे मुलींना डोळ्यांत जळजळ व्हायला लागली, तसेच श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. दिल्ली सरकारने घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी दिली. बात्रा हॉस्पिटलच्या डॉक्टरने सांगितले की, १0 ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना आमच्याकडे दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त रोमील बानिया यांनी सांगितले की, कंटेनरमधील हे रसायन चीनमधून आयात करण्यात आले होते. ते हरियाणातील सोनेपतला नेले जात होते. १0७ विद्यार्थिनी मजिठिया रुग्णायात, तर ६२ विद्यार्थिनी बात्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनरमधील रसायन चीनमधून आयात करण्यात आले होते. ते हरियाणातील सोनेपतला नेले जात होते. १0७ विद्यार्थिनी मजिठिया रुग्णायात, तर ६२ विद्यार्थिनी बात्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीत रसायन गळतीची ३00 विद्यार्थिनींना बाधा
By admin | Published: May 07, 2017 3:40 AM