लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : स्वदेशी बनावटीची युद्ध नौका आयएनएस मुरगाव रविवारी भारतीय नौदलात दाखल होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईतील नौदल गोदीत हा सोहळा होईल. क्षेपणास्त्र विनाशिका प्रकारातील या नौकेमुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढण्यासह देशाच्या सागरी सीमांची सुरक्षा अधिक भक्कम होईल, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
भारतीय नौदलाच्या ‘वॉरशिप डिझाईन ब्युरो’ने युद्धनौकेचे डिझाईन तयार केले गेले असून, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांनी तिची बांधणी केली आहे. या नौकेला ‘मुरगाव’ या गोव्यातील ऐतिहासिक बंदर शहराचे नाव देण्यात आले आहे. पोर्तुगीज राजवटीतून गोव्याच्या मुक्ततेस ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या युद्धनौकेचे गेल्या वर्षी १९ डिसेंबर रोजी जलावतरण करण्यात आले होते.
आयएनएस मुरगाव१६३मीटर लांबी १७मीटर रुंदी ७४०० टन वजन nचार शक्तिशाली गॅस टर्बाइनने सुसज्ज nवेग- ३० नॉट्सहून (समुद्री मैल) अधिक
nब्रह्मोस आणि बराक-८ सारख्या क्षेपणास्त्रांनी सज्जnइस्रायलचे एम-स्टार रडारnहवेतील लांब पल्ल्याचे लक्ष्य रडार शोधू शकते. n१२७ मिमी तोफ nसुपर रॅपिड गन माउंटn७० कि.मी. अंतरापर्यंत हवेतील विमानाला करू शकते लक्ष्यnजमिनीवरील ३०० कि.मी.पर्यंतच्या लक्ष्याचा वेध शक्य nक्षेपणास्त्रविरोधी एके-६३० तोफ प्रणाली nपाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर
आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धांदरम्यानही बचाव करण्यास आयएनएस मुरगाव सक्षम आहे. खराब वातावरणातही हेलिकॉप्टर लँड होऊ शकतात.