शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

काश्मीरमध्ये दगडफेकीसाठी 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सक्रिय

By admin | Published: April 24, 2017 10:57 AM

दगडफेकीमागे काश्मीरमध्ये सक्रिय असलेले 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमतश्रीनगर, दि. 24 - गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दगडफेकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र या दगडफेकीमागे काश्मीरमध्ये सक्रिय असलेले 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे सुरक्षा दलांवरील दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील ऑपरेशनमध्ये अडथळा आणण्यासाठी आणि सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी तरुणांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून भडकावलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जवळपास 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून दगडफेक करणा-या तरुणांना सुरक्षा दलांच्या ऑपरेशनबाबत माहिती पुरवली जाते आणि त्यानंतर त्यांना चकमक होणा-या ठिकाणी एकत्र जमवलं जातं. त्यातील 90 टक्के व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप हे बंद झाल्याची माहितीही एका पोलीस अधिका-यानं दिली आहे. दरम्यान 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जवळपास 250 सदस्य होते. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून चकमकीच्या ठिकाणी दगडफेक करणा-या तरुणांना एकत्र केलं जातं होतं आणि सुरक्षा दलांच्या ऑपरेशनला अडथळा आणण्यासाठी दगडफेक करण्यात येते. विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून दगडफेक करण्यासाठी प्रोत्साहित करणा-या ग्रुप अ‍ॅडमिनची पोलिसांना ओळख पटली असून, पोलिसांनी त्यांना काऊंसलिंगसाठीही बोलावलं आहे. आमच्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, जवळपास 90 टक्क्यांहून अधिक ग्रुप बंद झाल्याचा दावा एका पोलीस अधिका-यानं नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. इंटरनेट सेवा खंडित केल्यामुळे दगडफेकीच्या घटनांमध्ये कमी आली आहे. तसेच यासाठी त्यांनी बडगाम जिल्ह्यात झालेल्या दगडफेकीच्या घटनांचा हवाला दिला आहे. शनिवारी बडगाम जिल्ह्यात चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यावेळी तिथे फक्त मूठभर तरुणच सुरक्षा दलांवर दगडफेक करत होते. या दगडफेकीत आतापर्यंत डझनांहून अधिक तरुणांना सुरक्षा जवानांशी झालेल्या संघर्षात मृत्यू झाला आहे. मात्र इंटरनेट सेवा खंडित केल्यानं जम्मू-काश्मीरमधल्या व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.