लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशभरात सोमवारी ३० हजार ५४८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ८८ लाख ४५ हजार १२७ झाली. दुसरीकडे ८२ लाख ४९ हजार ५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी ८ वाजता ही आकडेवारी जारी केली. त्यानुसार, आतापर्यंत ४३५ नवीन रुग्णांसह एकूण १ लाख ३० हजार ७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्या सलग सहाव्या दिवशी पाच लाखापेक्षा कमी राहिली. सध्या ४ लाख ६५ हजार ४७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या एकूण रुग्णांच्या ५.२६ टक्के आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर ९३.२७ टक्के तर, मृत्यूचा दर १.४७ टक्के आहे. कोरोना रुग्णांची संख्या ७ ऑगस्ट रोजी २० लाख, २३ ऑगस्ट रोजी ३० लाख, ५ सप्टेंबर रोजी ४० लाख, १६ सप्टेंबर रोजी ५० लाख, २८ सप्टेंबर रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबरला ७० लाख तर, २९ ऑक्टोबरला ८० लाखावर पोहचली होती. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार, १५ नोव्हेंबरपर्यंत एकूण १२ कोटी ५६ लाख ९८ हजार ५२५ नमुने तपासण्यात आले.
मृत्यूची आकडेवारीराज्य मृत्यूमहाराष्ट्र ४५,९७४कर्नाटक ११,५२९तामिळनाडू ११,४७८पश्चिम बंगाल ७,६६१दिल्ली ७,६१४उत्तर प्रदेश ७,३७२आंध्र प्रदेश ६,८६८पंजाब ४,४५८गुजरात ३,८०३