नवी दिल्ली : दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि आसाममधील ३,०४० यात्रेकरूंची पहिली तुकडी शनिवारी सायंकाळी हज यात्रेसाठी येथून विमानाने सौदा अरबस्तानकडे रवाना झाली. यंदा भारतातून १,७५,०२५ एवढे विक्रमी यात्रेकरू हजला जाणार असून, ते विविध शहरांमधून येत्या ३ आॅगस्टपर्यंत अनेक तुकड्यांमधून रवाना होतील.अल्पसंख्य व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिल्लीतून जाणाऱ्या यात्रेकरूंना निरोप दिला. भारताचे सौदीमधील राजदूत अहमद जावेद व जेद्दामधील कौन्सेल जनरल मोहम्मद नूर रहमान शेख यांनी मदिना येथे यात्रेकरूंचे स्वागत केले.सरकारी अनुदानाविना होणारी पहिली यात्रा, सोबतीला पुरुष न घेता चार-चार महिलांच्या गटाने प्रथमच एकट्याने यात्रा करणे यासह अनेक सुधारणा लागू केल्याने यंदाची यात्रा वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे नक्वी म्हणाले. ते म्हणाले की, अनुदान बंद केल्याने खर्च तीन-चारपटींनी वाढेल, अशी भीती होती, परंतु प्रत्यक्षात खर्चात किरकोळ वाढ झाल्याच्या अनुभवाने यात्रेकरू खूश आहेत.नक्वी म्हणाले, एकूण ६०० हज समन्वयकांपैकी यंदा १०० समन्वयक महिला आहेत, हेही लक्षणीय आहे.यंदाची हजयात्रा अधिक सुखकर व आरामदायी होईल, अशी खात्री देताना नक्वी यांनी सांगितले की, यंदा मदिना व अरफात येथे निवासाची सोय आधी खात्री करून अधिक आरामदायी ठिकाणी करण्यात आली आहे, तसेच प्रवास व्यवस्था व वैद्यकीय सुविधाही सुधारण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर करण्यात आला आहे. अडीअडचणीला उपयोगी पडणारे ‘हजअॅप’ही यात्रेकरूंना देण्यात आले आहे. कौन्सेल जनरल शेख यांनी सांगितले की, सोबतीला पुरुष न घेता ज्या महिला एकट्या हजला येतील त्यांच्यासाठी निवासाची स्वतंत्र व अधिक सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील वर्षापासून जहाजानेही हज यात्रेला जाता यावे, असे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सिंगापूर, सौदी अरबस्तान व भारतातूनही काही प्रस्ताव आले आहेत. त्यावर लवकरच निर्णय होईल, असेही नक्वी म्हणाले.>राज्यातील यात्रेकरूंचे वेळापत्रकहज समितीने देशाच्या विविध शहरांतील यात्रेकरूंसाठी प्रस्थानाचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र व गोव्यातील यात्रेकरूंच्या तुकड्या रवाना होण्याच्या तारखा अशा:
३,०४० हज यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 5:00 AM