शहरं
Join us  
Trending Stories
1
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
2
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
3
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
4
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
5
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
6
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
7
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
8
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
9
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
10
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?
11
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
12
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
13
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
14
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
15
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
16
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
17
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
18
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
19
हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
20
पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!

आंध्र-तेलंगणात पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू, ४३२ रेल्वे गाड्या रद्द; जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 12:10 PM

Andhra Pradesh, Telangana Rain : दोन्ही तेलुगू भाषिक राज्यांना सोमवारी पावसाचा फटका बसला. 

Andhra Pradesh, Telangana Rain : हैदराबाद/विजयवाडा : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय रस्ते, रेल्वे मार्ग या वाहतुकीच्या साधनांचेही नुकसान झाले आहे. हजारो एकर शेतजमीन पाण्यात बुडाली असून बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी एजन्सी तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही तेलुगू भाषिक राज्यांना सोमवारी पावसाचा फटका बसला. 

तेलंगणामध्ये १६ आणि आंध्र प्रदेशात १५ जणांचा पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झाला. तेलंगणातील समुद्रमजवळ रेल्वे रुळाखालील खडीचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला. आंध्र प्रदेशात जवळपास साडेचार लाख लोकांना याचा फटका बसला आहे. विजयवाडामध्ये दुधासह जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये एनटीआर, गुंटूर, कृष्णा, एलुरु, पलानाडू, बापटला आणि प्रकाशम यांचा समावेश आहे, असे एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच, मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफच्या २० टीम आणि एनडीआरएफच्या १९ टीम कार्यरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अनेक भागांत २४ तासांहून अधिक काळ वीज खंडित झाल्यामुळे विजयवाड्यात जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. 

पुरामुळे इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोन सेवा विस्कळीत झाली आहे. हैदराबादमधील कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला. विजयवाडा शहर आणि आसपासच्या भागात वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत प्रकाशम बॅराजमधून ११.३ लाख क्युसेक पुराचे पाणी सोडण्यात आले.

तेलंगणात १६ जणांचा मृत्यूयाशिवाय, तेलंगणामध्ये पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने सोमवारी सुरुवातीला ५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. राज्य सरकारने केंद्राकडे तात्काळ दोन हजार कोटी रुपयांची मदत मागितली. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाधित भागांना भेटी देऊन पूर ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. 

पिकांचेही मोठे नुकसानराज्याचे आयटी आणि उद्योग मंत्री डी. श्रीधर बाबू म्हणाले की, नुकसानीचा अहवाल आल्यानंतरच संपूर्ण माहिती कळू शकेल. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वसमावेशक अहवाल सरकार केंद्राला सादर करेल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार दीड लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. खम्ममच्या पूरग्रस्त भागात घरातील साहित्य वाहून गेल्याची दृश्ये समोर आली आहेत. 

४३२ रेल्वे गाड्या रद्ददक्षिण मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने ४३२ गाड्या रद्द करण्यात आल्या तर १३ गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या. सोमवारी दुपारपर्यंत १३९ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच, दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही राज्यांतील संततधार पावसामुळे काझीपेठ-विजयवाडा विभागात पूर आणि दरड कोसळली असून पाच गाड्या अडकून पडल्या आहेत. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणाRainपाऊस