ऑनलाइन लोकमत
गुडगाव, दि. 10 - मारुती सुझूकीच्या मानेसर येथील प्लांटमध्ये 2012 रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी हरियाणामधील गुडगाव न्यायालयाने आपला निर्णय दिला असून 31 जणांना दोषी ठरवलं आहे. 117 जणांची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली आहे. होळीनंतर दोषींना शिक्षेची सुनावणी करण्यात येणार आहे. आरपी गोयल यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला असून यासाठी 505 पानांचं निकालपत्र तयार करण्यात आलं होतं. 148 आरोपींपैकी 90 जणांचा नाव एफआयरमध्ये नव्हतं.
18 जुलै 2012 रोजी मारुती सुझूकीच्या मानेसर प्लांटमध्ये उपोषणादरम्यान झालेल्या हिंसाचारात मॅनेजमेंटचे 98 लोक जखमी झाले होते. यावेळी जनरल मॅनेजर अवनीश देव यांनी जिवंत जाळण्यात आला होता. त्यांचा नंतर मृत्यू झाला. प्लांटचा अर्ध्याहून जास्त भाग जळून खाक झाला होता. परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोड कऱण्यात आली होती. या घटनेनंतर 525 लोकांनी आपली नोकरी गमावली होती. 148 जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता, ज्यामधील 139 जण जामीनावर बाहेर आहेत.
2012 Maruti Suzuki factory violence case: 31 people convicted and 117 acquitted by Haryana court.— ANI (@ANI_news) March 10, 2017