कानपूर: उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये मध्यरात्री दोन भीषण अपघात झाले. पहिला अपघात कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर भागात उन्नावहून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने झाला, यात २६ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरा अपघात अहिरवण उड्डाणपुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने लोडरला धडक दिली.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. यात ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक कुटुंब मुंडण समारंभासाठी विंध्याचल धाम येथे जात होते. यावेळी अहिरवण उड्डाणपुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या वाहणाला धडक दिली. पोलीस तसेच स्थानिकांनी वेळेवर पोहोचून मदत मोहिम सुरू केली. गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
कानपूरमध्ये भीषण अपघात, ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने 24 यात्रेकरूंचा मृत्यू, अनेक जण गंभीर
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने २६ यात्रेकरूंचा मृत्यू, अनेक जण गंभीर
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर भागात उन्नावहून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने २६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदत व बचावकार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे यात्रेकरू उन्नावमधील बक्सर येथील चंद्रिका देवी मंदिराचे दर्शन करून आपल्या गावी कोरथा येथे परतत असताना साढ पोलीस स्टेशन हद्दीतील गौशाळेजवळ ही ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. या अपघातानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तात्काळ जवळच्या सीएचसी रुग्णालयात दाखल आले. या ठिकाणी २६ जणांना मृत घोषित करण्यात आले, तर इतर गंभीर जखमी यात्रेकरूंवर उपचार सुरू आहेत.