नाशिक : पश्चिम विभागात निवडणूक कार्यालयाने ३१ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे निर्देशित केले असून, यात काही क्रिटिकल केंद्रांचाही समावेश आहे. या संवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक विभागाचे विशेष लक्ष असून, आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७, १२ व २४ साठी महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्पात आली आहे. विभागातील तिन्ही प्रभागांच्या १४२ मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक कार्यालयाला एकूण ३१२ मतदान यंत्र व १५७ नियंत्रण यंत्र प्राप्त झाले आहेत. या सर्व यंत्रांची अंतिम तपासणी झाली पूर्ण असून, मतदान यंत्र सीलबंद करून ठेवण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम विभागात निवडणूक कार्यालयाने मतदान प्रक्रिया सुनियोजित पद्धतीने पार पाडण्यासाठी जवळपास साडेसहाशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेच्या १० टक्के साधनसामुग्री राखीव ठेवण्यात आली आहे. ऐनवेळी तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागून नये म्हणून ही अतिरिक्त यंत्रांची व्यवस्था करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, निवडणूक कार्यालयाने पश्चिम विभागात संवेदनशील आणि क्रिटिकल असे ३१ मतदान केंद्र निश्चित केले असून, त्यासाठी विशेष पोलीस सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येण्याचे संकेत आहेत.
पश्चिम विभागात ३१ मतदान केंद्र संवेदनशीलप्रशासनाची तयारी
By admin | Published: February 17, 2017 9:41 PM