बंगळुरू : ‘पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल’ (पीसएलव्ही) या शक्तिशाली अग्निबाणाने येत्या १० जानेवारी रोजी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) तब्बल ३१ उपग्रह एकाच वेळी अंतराळात सोडणार आहे.या मोहिमेसाठी पीएसएलव्ही-सी ४० हा अग्निबाण वापरला जाईल. यात सोडल्या जाणा-या उपग्रहांमध्ये भारताचा ‘कार्टोसॅट-२’ मालिकेतील पृथ्वीचे निरीक्षण करणारा उपग्रह हा मुख्य व सर्वात मोठा उपग्रह असेल. याखेरीज भारताचे दोन लघू व एक अतिलघू उपग्रहही या वेळी सोडले जातील. इतर २८ लघू उपग्रह फिनलॅण्ड व अमेरिकेसह इतर देशांचे असतील. गेल्या आॅगस्टमध्ये अशाच प्रकारच्या अग्निबाणाने ‘आयआरएनएसएस-१ एच’ उपग्रह सोडण्याची मोहीम अपयशी ठरली होती. (वृत्तसंस्था)
३१ उपग्रहांचे होणार एकाच वेळी प्रक्षेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 4:08 AM