नवी दिल्ली, दि. 16 - भारताच्या सागरी सुरक्षेत महत्वाची भूमिका असलेल्या तटरक्षक दलासाठी केंद्र सरकारने 31,748 कोटी रुपये मंजूर केले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पुढच्या पाचवर्षात तटरक्षक दलाला अधिक बलवान आणि सशक्त करण्याच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानंतर तटरक्षक दल सर्वात छोटे सशस्त्र सैन्यदल आहे. 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तटरक्षक दलाची भूमिका अत्यंत महत्वाची बनली आहे. कारण त्यावेळी पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत आले होते.
तटरक्षक दलाची टेहळणी क्षमता वाढविण्यासाठी नव्या गस्ती नौका, बोटी, हॅलिकॉप्टर, विमाने आणि अन्य आवश्यक उपकरणे विकत घेण्यात येतील. तटरक्षक दलासाठी पुढच्या पाचवर्षांचा कृती आराखडा ठरवण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण सचिव संजय मित्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तटरक्षक दलासाठीच्या खरेदी व्यवहारांना मंजुरी देण्यात आली.
समुद्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तटरक्षक दलाच्या ताफ्यात 2022 पर्यंत 175 बोटी, 110 विमानांचा समावेश करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. समुद्र संपत्तीचे संरक्षण, समुद्र पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण ,तस्करी, समुद्री चाच्यांविरोधात कारवाई यांचा मुकाबला करण्यासाठी तटरक्षक दलाला पूर्णपणे सुसज्ज करण्याची योजना आहे. भारताला 7,516 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून यामध्ये 1,382 बेटे आहेत.
आणखी वाचा सैनिकांनो बंदुकी मोडा अन् काश्मिरींना मिठ्या मारा, सामनातून मोदींवर टीकानायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू, 82 जखमी
सध्या तटरक्षक दलाच्या 130 युनिटकडे 60 बोटी, 18 हॉव्हरक्राफ्ट, 52 छोटया इंटरसेप्ट बोटी, 39 डॉनियर टेहळणी विमाने, 19 चेतक हॅलिकॉप्टर, चार ध्रुव हॅलिकॉप्टर्स आहेत.
वसईच्या किनारपट्टीवर ‘सागरी सुरक्षाकवच’वसई विरारच्या किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेसाठी समुद्रात गस्त वाढविण्यात आली असून सर्व सागरी चेकपोस्टची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. याशिवाय सर्व लॅण्डींग पॉर्इंटसची नाकाबंदी करण्यात आली आहे.दहशतवादी हल्ला सागरी मार्गाने होण्याची शक्यता गृहीत धरून सागरी किनारपट्टीवर पालघर पोलिसांतर्फे सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते. स्पीड बोटीने किनारपट्टीवर गस्त घालून संशयास्पद बोटींची तपासणी करण्यात आली.