दीड महिन्यात ३२ हजारांवर मजुरांची वाढ! दुष्काळी परिस्थिती अन काम मागणी मेळाव्यामधून वाढतेय मजुरांची उपस्थिती
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM
दीड महिन्यात ३२ हजारांवर मजुरांची वाढ!
दीड महिन्यात ३२ हजारांवर मजुरांची वाढ!दुष्काळी परिस्थिती अन काम मागणी मेळाव्यामधून वाढतेय मजुरांची उपस्थितीसंतोष येलकर/ अकोला : दुष्काळी परिस्थिती आणि काम मागणी मेळाव्यांमधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांवर मजुरांच्या उपस्थितीत वाढ होत आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत रोजगार हमी योजनेच्या कामांवर ३२ हजार ६९८ मजूर उपस्थितीत वाढ झाली आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, हातून गेलेली पिके, नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले. दुष्काळी परिस्थितीत मजुरांकडून कामाची मागणी होत आहे. त्यानुषंगाने शासनाच्या रोहयो विभागामार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्ह्यात गत १ नोव्हेंबरपासून काम मागणी मेळावे घेतले जात आहेत. ऑक्टोबरअखेर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात रोहयो कामांवर १६ हजार ९६५ मजुरांची उपस्थिती होती. १३ डिसेंबरपर्यंत पाचही जिल्ह्यात रोहयो कामांवरील मजुरांची उपस्थिती ४९ हजार ६६३ वर पोहोचली आहे. ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़बॉक्स.............विभागातील जिल्हानिहाय रोहयो कामांवरील मजूर उपस्थिती!जिल्हा ऑक्टोबर १३ डिसेंबरपर्यंतअकोला ११५५ ३२५८अमरावती ९१५६ ३४७९८यवतमाळ १६९७ १५७४बुलडाणा २४६५ ३०६२वाशिम २४६५ ६९७१..........................................................................एकूण १६९६५ ४९६६३कोट..........रोहयो विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात काम मागणी मेळावे घेण्यात येत आहेत. या मेळाव्यांमध्ये मजुरांकडून काम मागणीपत्र घेण्यात येत आहेत. तसेच जॉबकार्डचे वाटप करण्यात येत आहे. या काम मागणी मेळाव्यांच्या माध्यमातून रोहयो कामांवर मजुरांच्या उपस्थिती वाढ होत आहे. गत ऑक्टोबर अखेरच्या तुलनेत १३ डिसेंबरपर्यंत विभागात रोहयो कामांवर ३२ हजारपेक्षा जास्त मजूर उपस्थितीत वाढ झाली आहे.-पी.डी.हेडाऊ, कार्यकारी अभियंता (रोहयो), विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती///////////////////////////////////////////////////////////////