चंडीगड : दारू समजून कीटकनाशक प्यायल्याने पंजाबी चित्रपट अभिनेता रणदीप भंगू यांचा मृत्यू झाला आहे. प्रकृती ढासळू लागल्यावर त्यांना तातडीने मोहालीवरून चंडीगड येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चमकौर साहिबजवळील चुहाडमाजरा या त्यांच्या वडिलोपार्जित गावात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, त्यांनी चुकून कीटकनाशक प्यायल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांना त्यांचा जीव वाचविण्यात अपयश आले. भंगू हे केवळ चांगले अभिनेतेच नव्हे तर एक उत्कृष्ट कबड्डीपटूही होते