नवी दिल्ली : हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा देशाला लाजवेल अशी घटना घडली. कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही जण २ महिलांची नग्न धिंड काढत असल्याचे दिसत आहे. धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. लक्षणीय बाब म्हणजे महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या ३२ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली असून हेरोदास मेईतेई असे आरोपीचे नाव आहे.
वृत्तसंस्थान एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुख्य आरोपी ज्याने हिरवा टी-शर्ट घातलेला होता त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने नग्न महिलेला पकडून ठेवले होते. त्याला आज सकाळी ओळख पटल्यानंतर एका कारवाईत अटक करण्यात आली. आरोपीचे नाव हुइरेम हेरोदास मेईतेई (३२) असे आहे. अशी माहिकी सरकारी सूत्रांनी दिली आहे.
मोदींचे आश्वासन बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोनं अनेकांना धक्का बसला. मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून छळ करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ माजली. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. नरेंद्र मोदी यांनी ही घटना लज्जास्पद असल्याचे म्हटले आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
"१५ वर्षांच्या मुलाकडून ४० वर्षीय महिलेवर अत्याचार, व्हिडीओ आला नसता तर PM बोलले नसते"
अमित शहांचे मुख्यमंत्र्यांना निर्देशमणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, व्हिडीओ प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. यातच, घटनेतील मुख्य आरोपीला थाउबल येथून अटक केल्याचेही समजते. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू आहे.