देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Patient) पुन्हा वाढ होऊ लागली असून काही जिल्ह्यांची परिस्थिती पुन्हा धोकादायक बनली आहे. एक असा जिल्हा आहे जिथे 50 किंवा 100 टक्के नाही तर 325 टक्क्यांनी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ 28 जून ते 27 जुलै या एका महिन्यातील आहे. (corona Patient increasing in Maharashtra two district Beed, Solapur)
हा जिल्हा मणिपूर (Manipur) राज्यातील चंदेल हा आहे. चंदेलमध्ये गेल्या चार आठवड्यांपैकी 28 जून ते 4 जुलै पर्यंतच्या पहिल्या आठवड्यात फक्त 8 रुग्ण सापडले होते. मात्र, ही संख्या वाढत गेली आणि 19 जुलै ते 25 जुलै दरम्यान तिथे 34 रुग्ण सापडले आहेत. रुग्णसंख्या जरी कमी असली तरी रुग्ण वेगाने वाढू लागल्याने सरकारची चिंता वाढली आहे. दुसरीकडे देशातील रुग्णदेखील वाढू लागले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट संपत असल्याची चिन्हे गेल्या काही काळापासून दिसत होती. मात्र, राज्यांनी लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल केल्याने रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्याप कोरोना गेलेला नाही, कोरोनाचे नियम पाळा असा सल्ला दिला आहे. तर अनेक तज्ज्ञांनी लॉकडाऊनचे निर्बंध हटविणे धोक्याचे ठरू शकते असा इशारा दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशातील 22 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची चिंताजनक परिस्थिती आहे. यापैकी 13 जिल्हे हे पूर्वोत्तर राज्यांपैकी आहेत. यामध्ये मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि आसाम आहे. तर उर्वरित 7 जिल्हे केरळ आणि 2 महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील बीड आणि सोलापूर हे दोन जिल्हे चिंता वाढवत आहेत. (Corona Virus in Maharashtra.)
एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, पूर्वोत्तर लोकांमध्ये कमी अँटीबॉडी विकसित झाली होती. यामुळे तिथे रुग्ण वाढ लागले आहेत. आयसीएमआरने केलेल्या सिरो सर्व्हेमध्ये आसाममध्ये 50 टक्के सिरो प्रसार आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांमध्ये बीड आणि सोलापर जिल्ह्यांत अनुक्रमे 28 आणि 33 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.