महिलांना सरकारी नोकऱ्यांत ३३ टक्के आरक्षण देणार; राहुल गांधींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 05:58 AM2019-03-14T05:58:22+5:302019-03-14T05:58:43+5:30

जाहीरनाम्यात आश्वासनाची शक्यता

33 percent reservation for women in government jobs; Rahul Gandhi's announcement | महिलांना सरकारी नोकऱ्यांत ३३ टक्के आरक्षण देणार; राहुल गांधींची घोषणा

महिलांना सरकारी नोकऱ्यांत ३३ टक्के आरक्षण देणार; राहुल गांधींची घोषणा

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी, मंदावलेला आर्थिक विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कृषिक्षेत्रातील घसरण यासह जनतेला भेडसावणाºया प्रमुख प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून, भाजपा आणि पंतप्रधान मोदींच्या राष्टÑवादाच्या चर्चेला मागे टाकण्याचे ठरविले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास महिलांना सरकारी नोकऱ्यांत ३३ टक्के आरक्षणाची घोषणा केलीच आहे.
राहुल गांधी यांना निवडणुकीची समीकरणेच बदलायची आहेत. राष्ट्रप्रेमाच्या नावावर पुलवामा व बालाकोटवर भाजपा लक्ष खेचून घेण्याचा प्रयत्न करेल, पण जनतेला भेडसावणाºया प्रश्नांवर आपण भर द्यायचा आहे, असे त्यांनी सांगितले आहे. यात बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न, बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता आदी मुद्दे असावेत. याशिवाय राफेल, नीरव मोदी, मेहुल चोक्सी आदी मुद्देही उपस्थित केले जातील.

देशाचा आर्थिक विकासाचा दर पाच वर्षांतील नीचांकावर आहे. कृषिक्षेत्राच्या उत्पन्नचा दरही घसरला असून, खासगी क्षेत्रातील गुंतवणूकही खालावली आहे. सीएमआयनुसार बेरोजगारीचा दर ७.२ टक्क्यांवर असून, एनएसएसओनुसार हा आकडा ६.१ टक्के आहे, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.

दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचा वायदा मोदी सरकारने पाळला नाही, उलट नोकºयाच हिरावून घेतल्या. नोटाबंदीमुळे दीड कोटी नोकºया गेल्या, जीएसटीने लघू व मध्यम उद्योग बंद पडून, अनेकांचे रोजगारही केले. मुद्राकर्ज योजनेबाबत सरकारचा दावा खोटा असल्याचेही प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
 

Web Title: 33 percent reservation for women in government jobs; Rahul Gandhi's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.