नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(सीआयएसएफ) या निमलष्करी दलात लवकरच ३३ टक्के महिला जवान असतील. तर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि भारत-तिबेट सीमा पोलिसात (आयटीबीपी) १५ टक्के महिलांचा समावेश केला जाईल. या दलांमध्ये जवळपास नऊ लाख कर्मचारी असून यामध्ये महिलांची संख्या फक्त २०,००० आहे. गृहमंत्रालयाने काढलेल्या एका पत्रकात निमलष्करी दलात महिलांचे संख्याबळ वाढविण्यासंदर्भात निर्णयाची माहिती देण्यात आली आहे आणि याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या दृष्टीने कॉन्स्टेबल स्तरावर ३३ टक्के जागांवर महिलांच्या नियुक्तीला परवानगी दिली आहे, असे या पत्रकात नमूद आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
निमलष्करी दलामध्ये आता ३३ टक्के महिला
By admin | Published: January 05, 2016 11:24 PM