नवी दिल्ली - एका आयएएस आधिकाऱ्याच्या 33 वर्षांमध्ये तब्बल 70 बदल्या झाल्या आहेत. हरियानामधील प्रदीस कासनी आज निवृत्त झाले. त्यांच्या 33 वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या 70 बदल्या झाल्या आहेत. शेवटच्या सहा महिन्याचा पगारही त्यांनी घेतला नाही. गेल्या सहा महिन्यापासून प्रदीस कासनी लुप्तप्राय हरियाना लँड यूज बोर्डात काम करत आहेत. 2017 मध्ये ते या पदावर रुजू झाले होते. गेल्या सहा महिन्यापासून त्यांना पगारही मिळाला नाही. याची सुनावणी सध्या हायकोर्टात सुरु आहे. हरियाना आयएएस ऑफिसर्स असोसिएशनने प्रद्रीप कासनी यांना चाय पार्टीला बोलवले आहे. इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना ते म्हणाले की, असोसिएशन मुख्य मुद्दा बाजूला ठेवत आहे.
1984मध्ये कासनी येथे हरियानामध्ये सिविल सर्विसमध्ये आधिकारी म्हणून रूजू झाले होते. त्यानंतर त्यांचे प्रमोशन होऊन ते आयएएस झाले होते. आयएएसची त्यांना 1997 बॅच मिळाली हेती. त्यानंतर 2014मध्ये भाजापा सरकार आल्यानंतर त्यांना दुडगांव डिव्हिजनचे कमिश्नर बणवण्यात आलं होते. पण फक्त 38 दिवसांमध्ये त्यांना या पदावरुन बदली करण्यात आली. त्यांना पदावरुन काढण्याचे कोणतेही कारण सरकारनं दिले नव्हते.