शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

३४ किलोमीटर्सच्या जमिनीचे अधिग्रहण पूर्ण

By admin | Published: May 07, 2016 1:54 AM

यवतमाळ राज्यातला दुष्काळग्रस्त जिल्हा असून या भागात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारला जाणीव आहे. म्हणूनच महाराष्ट्रात वर्धा नांदेड व्हाया यवतमाळ लोहमार्ग

नवी दिल्ली : यवतमाळ राज्यातला दुष्काळग्रस्त जिल्हा असून या भागात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारला जाणीव आहे. म्हणूनच महाराष्ट्रात वर्धा नांदेड व्हाया यवतमाळ लोहमार्ग प्रकल्प, रेल्वे मंत्रालयाचा अग्रक्रम आहे. २८४ किलोमीटर्स अंतराच्या या लोहमार्गापैकी ३४ किलोमीटर्स अंतराचे भू संपादन पूर्ण झाले आहे, असे रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी खासदार विजय दर्डांच्या प्रश्नाला उत्तर देतांना राज्यसभेत स्पष्ट केले.राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात रेल्वेमंत्र्यांना उपप्रश्न विचारतांना खासदार दर्डा म्हणाले, प्रलंबित प्रकल्पांबाबत रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारांना त्यांचा अग्रक्रम विचारला आणि महाराष्ट्र सरकारबरोबर एक संयुक्त करार केला. या करारानुसार राज्य सरकारला १0 हजार कोटी रूपये रेल्वे मंत्रालयाकडून मिळणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या निमित्ताने एका गंभीर विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो की वर्धा यवतमाळ नांदेड लोहमार्ग प्रकल्पाचे ११ फेब्रुवारी २00९ साली तत्कालिन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादवांनी भूमीपूजन केले.२0१६ पर्यंत त्याचे फक्त ३.१ टक्के काम झाले आहे. शेतकरी वर्गाच्या दृष्टिने विदर्भ आणि मराठवाडा अत्यंत संवेदनशील भाग आहे. या भागात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. प्रस्तुत प्रकल्पात भू संपादनाचा अडथळा असेल तर ज्या प्रकारे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी पुलाच्या आतील जमिनी संपादित करून त्याची नुकसान भरपाई दिली त्याच धर्तीवर या अत्यंत महत्वाच्या प्रलंबित प्रकल्पाचे कामही अग्रक्रमाने लवकरात लवकर आपण पूर्ण करावे, अशी माझी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर मी आपणास विचारू इच्छितो की हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी पूर्ण होईल? विदर्भ आणि मराठवाड्यावर कधी प्रभूकृपा होईल? प्रभू खरोखर प्रसन्न झाले तर सारी कामे सुरळीत पार पडतात, यावर माझा विश्वास आहे. रेल्वेमंत्र्यांनी या प्रश्नाला उपरोक्त उत्तर दिले.वर्धा-नांदेड लोहमार्ग प्रकल्पाची पार्श्वभूमी- संसदेत यंदाचा रेल्वे संकल्प मांडला जाण्यापूर्वी रेल्वे मंत्र्यांनी खासदारांकडून अग्रक्रम ठरवण्यासाठी पूर्वसुचना मागवल्या होत्या. त्याला अनुसरून खासदार विजय दर्डांनी वर्धा यवतमाळ नांदेड लोहमार्ग प्रकल्प कसा संथगतीने चालला आहे, यावर प्रकाशझोत टाकीत सुरेश प्रभूंना एक सविस्तर पत्र पाठवले. हा लोहमार्ग जेव्हा मंजूर झाला तेव्हा एकुण प्रकल्पाचा खर्च २७४ कोटी ५५ लाख रूपये होता. विलंब झाल्यामुळे आता हा खर्च १६00 पेक्षा अधिक कोटींवर गेला आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकार ६0 टक्के व राज्य सरकार ४0 टक्के रक्कम खर्च करणार आहे. २८४ किलोमीटर्सच्या या लोहमार्गातील १७0 किलोमीटर्सचे अंतर एकट्या यवतमाळ जिल्हयात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे हा जिल्हा अगोदरच संवेदनशील असून देशाच्या करूणेला पात्र ठरला आहे. तरीही या संयुक्त प्रकल्पात २00९ पासून आत्तापर्यंत फक्त १८४ कोटी रूपये खर्च झाले आहेत. याच गतीने या लोहमार्ग प्रकल्पाचे कामकाज सुरू राहिले तर हा लोहमार्ग तयार होण्यास आणखी १00 वर्षे लागतील अशी जाणीवही खा. दर्डांनी या पत्रात रेल्वेमंत्र्यांना करून दिली होती. राज्यसभेतील दर्डांच्या प्रश्नाची अशी पूर्वपिठीका आहे.