शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

राजस्थानमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत, दौसामध्ये 341 मुलांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 10:35 PM

Corona Virus News : दौसामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत.  याठिकाणी 341 मुलांना कोरोना झाला आहे. ही मुले 0 ते 18 वर्षे वयोगटातील आहेत.

ठळक मुद्देतिसर्‍या लाटेची शक्यता पाहता दौसा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.तिसरी लाट येण्यापूर्वीच मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.

जयपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अजूनही संपलेला नाही, तर आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तज्ज्ञ आणि सरकारकडून तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ही तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. यातच आता राजस्थानमधील दौसामध्ये कोरोनाची तिसरी लाट ठोठावण्याची चिन्हे दिसत आहेत. दौसामध्ये 341 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेची शक्यता पाहता दौसा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. (341 children found covid positive at dausa in rajasthan, corona third wave child infected)

दौसामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत.  याठिकाणी 341 मुलांना कोरोना झाला आहे. ही मुले 0 ते 18 वर्षे वयोगटातील आहेत. दौसामध्ये 1 मे ते 21 मे दरम्यान 341 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. येथील जिल्हाधिकारी म्हणाले की, 341 मुले संक्रमित आहेत, परंतु त्यापैकी कोणीही गंभीर नाही. दरम्यान, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेता दौसा जिल्हा रुग्णालयाला सतर्क करण्यात आले आहे.

(Mucormycosis : दिल्लीतील दोन रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचा दुर्मीळ संसर्ग, चिंता वाढली)

विशेष म्हणजे, तिसरी लाट येण्यापूर्वीच मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यांतील मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असू शकते. तिसऱ्या लाटेत मुले सर्वात कोरोना पॉझिटिव्ह होतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर वाईट परिणाम होणार नाही, नीती आयोगाचा दावादेशात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका आहे. मात्र, त्याचा परिणाम कमी असेल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. तसेच, जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यात कोणतेही लक्षणे नसतील किंवा साधारण लक्षणे असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल, असेही डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

(Uddhav Thackeray : "लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होतं, हे कोरोनानं दाखवून दिलं")

भारतात कोरोनाची तिसरी लाटअनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्याच्या आसपास भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. ही लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मध्यम स्वरुपाची असेल, असे म्हटले जात आहे. याशिवाय, काल कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत ही लाट येईल, येणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत सध्यातरी कुणी विश्वासपूर्वक काही सांगू शकत नाही. मात्र येणाऱ्या काळात विषाणूमध्ये म्युटेशन झाले तर त्याचा मुलांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे मुलांचा विचार करू इंफ्रास्ट्रक्चर तयार करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थान