शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Himachal Pradesh Weather: हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा कहर, ट्रेकिंगला गेलेल्या 35 IIT विद्यार्थ्यांसह 45 जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 8:45 AM

Himachal Pradesh Rains Update: हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

शिमला- हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. त्यातच अनेक ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे. विशेष म्हणजे या अतिवृष्टीमुळे ट्रेकिंगला गेलेल्या 35 IIT विद्यार्थ्यांसह 45 जण बेपत्ता झाले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे तिकडचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच जास्त उंचीच्या ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे. बेपत्ता असलेला एक विद्यार्थी अंकित भाटी याच्या वडिलांनी सांगितलं की, सर्व जण हम्पता येथे ट्रेकिंगला गेले होते. त्यांना मनालीत परतायचं होतं. परंतु त्यांच्याशी संपर्क तुटला आहे.लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात 8 जणांचा एक ग्रुप ट्रेकिंगसाठी गेले होते. यात ब्रुनेईची एक महिला संजिता तुबा, नेदरलँडचे एबी लिम आणि 6 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या ग्रुपमधील प्रियंका वोरा, पायल देसाई, दीपिका, दिव्या अग्रवाल, अभिनव चंदेल आणि अशोक बेपत्ता आहेत. हिमाचल प्रदेशमधल्या मुसळधार पावसाचा कहर पाहता कांगडा जिल्ह्यातील व्यास नदीवर असलेल्या पोंग धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊ शकतात. कारण नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. बीबीएमबीच्या अधिका-याच्या माहितीनुसार, व्यास नदीवरील धरणाचे दरवाजे कधीही उघडण्यात येऊ शकतात. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.हिमाचल, पंजाब, काश्मिरात मुसळधार पाऊसहिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, पंजाब, उत्तराखंड या राज्यांत पावसाचा कहर सुरू असून, अनेक ठिकाणी दरडीही कोसळत आहेत. उत्तर भारतात या पावसाने ११ बळी घेतले आहेत. हिमाचलच्या अनेक भागात मुसळधार पावसाने आलेल्या नद्यांना आलेल्या पुरात एक इसमाचा आणि एका मुलीचा मृत्यू झाला. कुल्लू जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रवासी बस, ट्रकसह अनेक वाहनेही पुरात वाहून गेली आहेत. अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर काही पुरात वाहून गेली आहेत. पावसाचा जोर असतानाच रोहतांग पाससह अनेक भागांत आताच बर्फवृष्टी सुरू झाली आहे. कुल्लू जिल्ह्यात रविवारी डोबी येथे अचानक आलेल्या पुरानंतर हवाई दलाच्या जवानांनी १९ जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. राज्याच्या ८ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कांगडा, चंबा, मंडी जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रावी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. डोंगरी भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. चंबा जिल्ह्यात २४ तासात १८० मिमी पाऊस झाला. काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून सोमवारी २९ जणांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या.

टॅग्स :Himachal Pradesh Rainsहिमाचल प्रदेश पूरHimachal Pradeshहिमाचल प्रदेश