नवी दिल्ली : १९९९-२००० मध्ये उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सिकरीतील चबेली टिला येथे करण्यात आलेल्या उत्खननात किमान ३५ खंडित जैन मूर्ती सापडल्या होत्या. यापैकी काही मूर्ती तेथील पुरातत्व खात्याच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. महेश शर्मा यांनी गुरुवारी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने १५ वर्षांपूर्वी बीर छबिली टिला, फतेहपूर सिकरी आणि आग्रा येथे उत्खनन केले होते. या उत्खननात सहाव्या शतकापासून तर अठराव्या शतकापर्यंतच्या ३५ जैन मूर्ती सापडल्या, ज्यात श्रुतीदेवी जैन सरस्वती, जैन तीर्थंकर आदिनाथ, संभवनाथ, शांतीनाथ, कुंथुनाथ, नेमीनाथ आणि पार्श्वनाथ यांच्या मूर्तींचा समावेश आहे. बहुतांश जैन मूर्ती या नवव्या ते बाराव्या शतकातील आहेत, असे डॉ. शर्मा यांनीसांगितले.डॉ. शर्मा पुढे म्हणाले, नैसर्गिक मातीपर्यंत पोहोचल्यानंतर उत्खनन कार्य थांबविण्यात आले होते. पुरातत्व खात्याने उत्खनन स्थळ योग्यरीत्या संरक्षित केले होते आणि निवडक मूर्ती वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)किरकोळ व्यापारात एफडीआयमल्टी ब्रँड किरकोळ व्यापारात विदेशी थेट गुंतवणूक (एफडीआय) धोरणाच्या संदर्भात सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे विजय दर्डा यांनी विचारलेल्या अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) निर्मला सीतारामण यांनी राज्यसभेत सांगितले. तथापि विचारण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे सीतारामण देऊ शकल्या नाही.मल्टी ब्रँड किरकोळ व्यापारात विदेशी थेट गुंतवणुकीच्या विद्यमान धोरणात बदल करण्याची सरकारची इच्छा आहे किंवा काय, या प्रश्नालादेखील त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
फतेहपूर येथे १५ वर्षांपूर्वी सापडल्या ३५ जैन मूर्ती
By admin | Published: February 26, 2016 3:53 AM