शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

लष्करात नोकरीच्या आमिषाने ३५ लाखांची फसवणूक

By admin | Published: October 08, 2016 11:52 PM

देवळाली कॅम्प : सात युवकांकडून प्रत्येकी सहा ते साडेसहा लाख रुपये उकळले

देवळाली कॅम्प : सात युवकांकडून प्रत्येकी सहा ते साडेसहा लाख रुपये उकळलेनाशिक : देवळाली कॅम्प परिसरात उपस्थित राहून लष्करात भरती करून देण्याच्या नावाखाली मुंबईतील एका युवकासह इतर सहा जणांची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी फसवणूक झालेल्या युवकाचे वडील यशवंत मारोती पाटील (५४, रा़ ८/१, नसरूद्दीन चाळ, गावदेवी रोड, कांदीवली (पूर्व, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित प्रकाश विक्रम चव्हाण (रा़ लखमापूर, ता़ सटाणा, जि़ नाशिक) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित प्रकाश चव्हाण हा देवळाली कॅम्पच्या परिसरात उपस्थित राहून सैन्यात भरतीसाठी आलेल्या युवकांना हेरून भरतीचे आश्वासन देत असे़ २३ नोव्हेंबर २०१३ ते २७ जानेवारी २०१५ या कालावधीत कांदीवली येथून भरतीसाठी आलेल्या पाटीलसह अन्य सहा युवकांना भरतीचे आश्वासन देऊन प्रत्येकी सहा ते साडेसहा लाख रुपयांची मागणी केली़ या युवकांनी चव्हाणच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे खात्यावर (३१७९४४१७३४९) ३४ लाख ५ हजार रुपये जमा केले़ तर यशवंत पाटील यांनी मुलाच्या नोकरीसाठी चव्हाणची भेट घेऊन ८० हजार रुपये रोख दिले होते़संशयित चव्हाणच्या खात्यात पैसे जमा करून दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी सैन्यात भरती केले नाही़ त्यामुळे यशवंत पाटील यांनी पाठपुरावा केला असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे गाठून संशयित चव्हाणविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़ (प्रतिनिधी)